नागझरी येथे जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ तसेच विकासकामांचा लोकार्पण सोहळा !

नागझरी येथे जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ तसेच विकासकामांचा लोकार्पण सोहळा !

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील नागझरी येथे जल जीवन मिशन अंतर्गत ७० लक्ष रुपयांच्या कामाचा भूमिपूजन सोहळा तसेच १५ लक्ष रुपयांच्या रुपये स्मशानभूमी सरंक्षण भिंत बांधकाम, १६ लक्ष रुपयांच्या शेड बांधकाम, पेव्हर ब्लॉक लोकार्पण सोहळा आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधत केलेल्या सन्मानाचा स्वीकार केला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच रामकिशन एकनाथ सूर्यवंशी हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके यांची उपस्थिती होती यावेळी शासकीय कंत्राटदार शुभम दहिफळे, उपसरपंच उद्धव इप्पर, चांगदेव दहिफळे, प्रशांत भोसले, चेअरमन उजना शिवशंकर आगलावे, बालाजी नागरगोजे, खंडाळी सरपंच अशोकराव मोठे, बालेश अंकल पौळ, बंडू पौळ, अमोल पौळ, ग्रामविकास अधिकारी कोल्हे साहेब, कृषी सहाय्यक कलमे साहेब, अभियंता रोकडे सर, भानुदास सूर्यवंशी, माधव इप्पर, मारोती इप्पर, श्याम सूर्यवंशी, शिवराम उगिले, हनमंत इप्पर, बालाजी इप्पर, बालाजी नागरगोजे आदी मान्यवर उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!