फार्मसी महाविद्यालयात’फार्मा कार्निव्हल 2023 स्नेहसंमेलन सोहळा संपन्न

फार्मसी महाविद्यालयात'फार्मा कार्निव्हल 2023 स्नेहसंमेलन सोहळा संपन्न

उदगीर(एल.पी.उगीले) : येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ,उदगीर संचलित फार्मसी महाविद्यालयात ‘आजादी का अमृत महोत्सव’ व संस्थेच्या रौप्य महोत्सवा निमित्त “फार्मा कार्निव्हल 2023” स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर जगताप होते. तर उदघाटन शिवलिंगेश्वर फार्मसी कॉलेज अलमला येथील डी फार्म चे प्रमुख डॉ. सुरज मालपाणी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून लोकप्रिय कॉमिडन महाराष्ट्राचे हास्यसाम्राट प्रा. दीपक देशपांडे यांची उपस्थिती होती.

यावेळी व्यासपीठावर कृष्णा गथडे, प्राचार्य गणेश तोलसरवाड, ज्योती तारे, नागेसन तारे, डॉ. धनंजय गोंड,डॉ. पवार ,डॉ. एस. एन, जाधव, संजय हट्टे, अतेंद्र सिंग, नुतून नायर, मनोरमा शास्त्री,ज्योती स्वामी, अमर तांदळे,प्रा.राहुल पुंडगे, प्रा.आकाश कांबळे,डॉ. चव्हाण एस.एन., वंदना तोलसरवाड, सुरेश तोलसरवाड, प्रियंका तोलसरवाड, मनीषा मालपाणी यांची उपस्थिती होती.

या स्नेहसंमेलनात ‘आजादी का अमृत महोत्सव’ हा विषय विद्यार्थ्यांना कलाविष्कारासाठी ठेवण्यात आला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर एका पेक्षा एक सरस अशी कलाविष्कार सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. यासोबतच विद्यार्थ्यांनी लोकगीत, चित्रपट गीत, यावर वयक्तिक व सामूहिक कला सादर केली.

या स्नेहसंमेलनाचे प्रमुख आकर्षण लोकप्रिय कॉमिडिन हास्यसाम्राट प्रा. दीपक देशपांडे हे होते. त्यांनी सुरवातीला आपल्या कलने उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकामध्ये उत्साह भरला. त्यांनी विविध सिने अभिनेते व राजकारणी आणि देशातील विविध भागात बोलल्या जाणाऱ्या भाषेची नक्कल करीत सर्वत्र हस्यमय वातावरण केले.

प्रारंभी स्नेहसंमेलनाचे उदघाटक डॉ. सुरज मालपाणी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,विद्यार्थ्यांना महाविद्यालय शिक्षणातूनच विचारांची देवाण-घेवाण होते. पुस्तकी शिक्षणा सोबतच व्यक्तिमत्व विकास ही महत्वाचा असतो. व्यक्तिमत्त्व विकास साधण्यासाठी विद्यार्थ्यांनी नेहमी संघर्षाची तयारी ठेवली पाहिजे. यश अपयश पचवीता आले पाहिजे,असे ही ते म्हणाले.यासोबतच त्यांनी गुरू-शिष्य संबंध किती महत्वाचे आहे, हे विविध उदाहरण देत समजावून सांगितले.

याप्रसंगी स्नेहसंमेलनाचे अध्यक्ष डॉ. सुधीर जगताप असे म्हणाले की,महाविद्यालय नेहमी विद्यार्थीना आपल्या कलागुणांना पुढे आणण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करीत असतो. याच कार्यक्रमातून विद्यार्थी आपला सार्वगिण विकास साधत असतो.या क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रमातून यश अपयश येत असतात, त्यामुळे खचून न जाता अधिक जोमाने पुढे जावे, असे ही त्यांनी सांगितले.

या स्नेहसंमेलनाचे प्रास्ताविक प्राचार्य गणेश तोलसरवाड यांनी केले. त्यांनी आपल्या मनोगतात महाविद्यालयाच्या वाटचाली आणि यशस्वीतेचा आलेख मांडला. सूत्रसंचालन दिग्विजय केंद्रे,ज्योती पांडे, वैभव बिडवे यांनी केले व आभार झेबा बेग यांनी मानले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीपाद अहंकारी, महेश मुक्ता,मधिहा शेख, किरण भालेराव, वडे मालिका, बिद्री रोमन, वसुधा जाधव, संदेश गवळी, नवनाथ बेडके, विश्वनाथ मोरखडे, उमाकांत पवार, विद्या पाटील, शेख अशिया, गोरे अंजली, शिंदे साधना यांनी सहकार्य केले.

About The Author

error: Content is protected !!