वलांडी येथे माजी आमदार धर्माजी सोनकवडे यांच्या फलंदाजीने खुल्या टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ
देवणी (रणदिवे लक्ष्मण) : देवणी तालुक्यातील वलांडी येथील कवठाळ रोडवरील मैदानावर खुले टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेचे शुभारंभ बुधवार माजी आमदार धर्माजी सोनकवडे व लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडीतराव धुमाळ व चेअरमन व्यंकटराव पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून व फलंदाजी करून करण्यात आले.या स्पर्धेत एकुण ५२ क्रिकेट संघांनी सहभाग घेतला असून यात लातूर, उमरगा, बसवकल्यान, भालकी, औराद शहाजानी, कासारसीरसी सह छोट्या मोठ्या ठिकाणाहून आलेल्या संघात क्रिकेट सामने खेळविण्यात येणार आहेत.तसेच जागृती साखर कारखाना महिला क्रिकेट संघ आणि धनेगाव येथील महादेव विद्यालय महिला क्रिकेट संघात सामना रंगणार आहे.दररोज सकाळी १० वाजल्यापासून तीन सामने खेळविले जाणार असून, प्रतेक सामना ८ षटकांचा होणार आहे. तर अंतिम सामना १० षटकांचा खेळविण्यात येणार आहे. प्रथम येणाऱ्या संघास लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडीतराव धुमाळ यांच्या वतीने रोख ५१ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. तर द्वितीय येणाऱ्या संघास धनेगावचे उपसरपंच रविंद्रकुमार पाटील यांच्या वतीने २१ हजार रुपयांचा पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. तसेच तृतीय येणाऱ्या संघास काँग्रेस किसान सेलचे देवणी तालुकाध्यक्ष दत्ता डुब्बे यांच्या वतीने ११ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. व इतर पारितोषिके वितरण करण्यात येणार आहे. स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी डॉ. अरविंद भातंब्रे, माजी सरपंच राम भंडारे, उपसरपंच प्रा. महेमूद सौदागर, माजी उपसरपंच दिनेश पाटील, उद्योजक राजकुमार हुडगे, स्पर्धेचे आयोजक शफीक सौदागर, मुस्ताक क़ादरी, रवी गायकवाड, मोईन सौदागर, बाळु पाटील, दीपक कल्लूरे, खमर मल्लेवाले, धनराज बिरादार, हकीम बौडीवाले, अहेमद सौदागर, मौला शेख, मुकेश कांबळे, नितीन वाघमारे तोफीक जमिनदार यांच्यासह क्रिकेट प्रेमींची उपस्थिती होती.
