स्नेहसंमेलनातून समाज प्रबोधनाचा जागर

स्नेहसंमेलनातून समाज प्रबोधनाचा जागर

उदगीर (एल.पी.उगीले) : तालुक्यातील हकनकवाडी येथील सत्यशोधक पर्यावरण विकास विद्यालयात घेण्यात आलेल्या वार्षिक स्नेहसंमेलनातून समाज प्रबोधनाचा जागर घालण्यात आला.

अध्यक्षस्थानी संस्थासचिव प्राचार्य प्रमोद चौधरी होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून पर्यवेक्षक सिद्धार्थ बोडके, संस्था सदस्य प्रा. एम. व्ही. स्वामी, सहसचिव प्रणयन चौधरी, सदस्य प्रयास चौधरी, सरपंच सुग्रीव पवार, उपसरपंच नवनाथ फड, माजी सरपंच ज्ञानोबा मुंडे, मुख्याध्यापक चंद्रपाल पाटील, माजी विद्यार्थी तथा पोलीस निरीक्षक विलास पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती. या वार्षिक स्नेहसंमेलनात इयत्ता ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी गीत गायन, नृत्य व नाटीका सादर करून रसिक श्रोत्यांची दाद मिळविली. तसेच समाजातील ज्वलंत प्रश्नावर भाष्य करत समाज प्रबोधनाचा जागर घातला. प्रास्ताविक मुख्याध्यापक चंद्रपाल पाटील यांनी केले. सूत्रसंचालन संतोष कांबळे यांनी तर आभार नामदेव मुंडे यांनी मानले. यासाठी रसूल पठाण, अमर जाधव याच्यांसह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी पुढाकार घेतला.

About The Author

error: Content is protected !!