जनतेमध्ये जाऊन शिवसैनिकांनी कामाला लागावे – बालाजी रेड्डी

जनतेमध्ये जाऊन शिवसैनिकांनी कामाला लागावे - बालाजी रेड्डी

उदगीर (एल.पी.उगीले) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे, मराठवाडा संपर्क नेते खासदार चंद्रकांतजी खैरे, मराठवाडा समन्वयक विश्वनाथ जी नेरूळकर यांच्या आदेशाने शिवसेनेचे आढावा बैठक शासकीय विश्रामगृह उदगीर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीला उपस्थित शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांनी सर्व पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करताना शिवसेना ही घराघरांमध्ये वाढवण्यासाठी गावा गाव मध्ये जाऊन, जनतेचे प्रश्न सोडवण्याचे काम पदाधिकारी, शाखाप्रमुख यांनी करावे. जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करावी, नवीन शाखा प्रमुखाचे नियुक्ती करून नवीन बी एल ए व बुथ प्रमुख नेमणूक करण्यात यावेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका याच्या निवडणुकीच्या तयारीला लागा. येणारी सत्ता शिवसेनेचीच असेल, त्यामुळे आतापासूनच पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे, पदाधिकारी मोठे झाल्याशिवाय राहणार नाहीत. असे आश्वासन पदाधिकाऱ्याला जिल्हा प्रमुख यांनी दिले, तसेच महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे माजी तालुका प्रमुख तातेराव मुंडे यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला .त्यावेळी उपस्थित जिल्हा संघटक गजानन होनराव ,उप जिल्हाप्रमुख अंकुश कोणाळे, प्रकाश हैबतपुरे विधानसभा प्रमुख, कैलास पाटील तालुका प्रमुख, बालाजी पुरी तालुका संघटक ,मुन्ना पांचाळ शहर प्रमुख, संजय मठपती शहर संघटक, माजी जिल्हा संघटक महिला आघाडी मैनाताई साबने, गोविंद कोंपले पंचायत समिती माजी सदस्य, जिल्हा समन्वक शैलेशजी वडगावे, युवा सेना जिल्हा सरचिटणीस रमण माने, तालुका प्रमुख चंद्रकांत सांगळे, शहर प्रमुख रोहीत पाटील, महेश फुले उप तालुका प्रमुख, प्रशांत पाटील उपतालुका प्रमुख , ॲड. रामदास काकडे, उपतालुका प्रमुख, मिथुन वाडीकर, उपतालुका प्रमुख गोविंद अण्णा बेंबडे, व्यंकट अण्णा साबणे, बन्सीलाल कांबळे,लक्ष्मीकांत गुडमेवार,दिनेश पाटील,दत्ता मोरे , सोमनाथ मटकटे उपशहरप्रमुख, जमिरोद्दिन मलंग उपशहरप्रमुख,सोमनाथ व्दासे, शरद सावरे वाहतूक सेना तालुका प्रमुख, ॲड. विष्णुकांत चिंतलवार शहर समन्वयक, अरुण बिरादार तालुका समन्वयक, प्रशांत सोनटक्के, गोविंद जाधव, सखाराम गुऱ्हाळे, सचिन माकनेश, मनोज फुले, अमित निडेबने,संतोष निडेबन, दयानंद पूलबुते, अमोल जाधव, धोंडीराम जाधव, ओंकार विळेगावे, जनक जाधव, दिलीप जाधव, सिद्धेश्वर मोरे, राम काकडे, संगम बिरादार, महालिंग हेरकर, संगमेश्वर सोनटक्के, शंकर काळे, ओंकार ददापुरे,हरी गुऱ्हाळे इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते. या बैठकीचे नियोजन शिवसेना तालुका प्रमुख कैलास पाटील यांनी केले होते .

About The Author

error: Content is protected !!