स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाच्या रौप्य महोत्सव निमित्त रक्तदान शिबिर
उदगीर(एल.पी.उगीले) : या वर्षी स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाच्या रौप्य महोत्सवा निमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
सदर रक्तदान शिबिर स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ फार्मसी,स्वामी विवेकानंद अध्यापक महाविद्यालय,स्वामी विवेकानंद महाविद्यालय(एनएसएस विभाग),स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ नर्सिंग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.या रक्तदान शिबिर मध्ये एकूण 78 रक्तदात्यांनी रक्तदान करत हा दिवस साजरा केला.या विशेष कार्यक्रम सोबत या संस्थेचे अध्यक्ष सुधीर जगताप यांचा 53 वा वाढदिवस असा दुग्ध शर्करा योग या निमित्ताने साजरा झाला.
या रक्तदान शिबिरात सहा तरुणींनी प्रथम रक्तदान केले,या शिबिरात विविध राज्यातील तरुणांचा सहभाग दिसून आला. या रक्तदान शिबीर मध्ये अमर तांदळे,सौ.मनोरमा जगताप,दीपक तिवारी,येनाकिकर शंतनु, दिपक कुमार यादव,लिव्हिंगस्टोन कामेइ,नवीन भुसुम,संजीवकुमार सिंघ,अर्पित धोंगडे,सय्यद ताहेर,प्रणित पाटील,सतीश वाघमारे,कु.कल्याणी कदम,महेश कस्तुरे,हर्षवर्धन पवार, सुरवसे रोहित,धोंडीबा शिंदे,आयुष शुक्ला,मुळे मारोती यांनी रक्तदान केले.
हे रक्तदान शिबिर यशस्वीतेसाठी अमर तांदळे,गणेश तोरसलबाड,डॉ धनंजय गौंड,प्राचार्य मनोरमा शास्त्री,प्राचार्य ज्योती तारे,प्राचार्य नागसेन तारे,डॉ गोपाळ पवार,महेश हुलसुरे,वैभव बिडवे,राहुल पुंडगे यांनी परिश्रम घेतले.
नागप्पा अंबरखाने ब्लड सेंटर उदगीरच्या वतीने बी टी ओ डॉ. शेटकार बस्वराज,पी आर ओ ओमकार गांजुरे,सचिन कोनाळे,अविनाश बिरादार,सपना कांबळे,पांचाळ उमाकांत,पटणे लक्ष्मण,बालाजी खडकखोरे,अविनाश जयकर यांनी रक्तसंकलानाचे कार्य केले.
