रंगकर्मीच्या वतीने इनरव्हील क्लब विशेष कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित

रंगकर्मीच्या वतीने इनरव्हील क्लब विशेष कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित

उदगीर (एल.पी.उगीले) : मागील दोन वर्षापासुन सामाजिक क्षेत्रात नाविन्यपुर्ण व सातत्याने करत असलेल्या कार्याची दखल घेत, रंगकर्मी साहित्य कला क्रिडा प्रतिष्ठानच्या वतीने माजी राज्यमंत्री आ .संजय बनसोडे, आखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, सुप्रसिद्ध अभिनेते कैलास वाघमारे , रंगकर्मी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. बिभीषण मद्देवाड यांच्या हस्ते इनरव्हील क्लबच्या सदस्यांचा गौरव करण्यात आला.

प्रत्येक वर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करणार्‍या रंगकर्मी प्रतिष्ठानने या वर्षी इनरव्हील क्लब उदगीरला विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित केले .या वेळी रंगकर्मीने इनरव्हीलच्या कार्याची दखल घेत मानाच्या पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल रंगकर्मी प्रतिष्ठानचे आभार व्यक्त करत “हा पुरस्कार आम्हाला पुढील कार्यास प्रेरणा देईल” असे मत इनरव्हील क्लब उदगीरच्या अध्यक्षा मीरा चंबुले यांनी व्यक्त केले.

या प्रसंगी इनरव्हील क्लब उदगीर उपाध्यक्ष स्वाती गुरुडे, सचिव शिल्पा बंडे, कोषाध्यक्ष मानसी चन्नावार, एडिटर सौ. पल्लवी मुक्कावार, आय एस ओ स्नेहलता चणगे,सीसी प्रा. अश्विनी देशमुख,तसेच सदस्य दिपा आंबेसंगे, प्रिती दुरुगकर, योजना चौधरी, रोहिणी चाटे, सारिका वट्टमवार,माया पाटील,राणी वैजापूरे,मीरा गुरुडे,प्रिया नरखेडे, सविता सांदोळकर, डॉ. आशा मद्देवाड,वाणी कोंडावार,पुजा गर्जे,यांची उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!