पोलीस ठाणे आवारात मद्यधुंद मद्यापीचा आरडाओरड; एकाविरुध्द गुन्हा दाखल
देवणी ( रणदिवे लक्ष्मण) : देवणी पोलीस ठाणे आवारात मद्यधुंद मद्यापीने आरडाओरड केल्या प्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहीती देवणी पोलिसांनी दिली.याबाबत देवणी पोलीसांच्या वतीने मिळालेली अधिक माहिती अशी की, एक इसम दारू पिवुन जखमी अवस्थेत मोठ मोठयाने आरडा ओरड करीत पोलिस स्टेशनला आला, त्यास पोलिसांनी काय झाले म्हणुन विचारपुस करता त्याने, मी दारू पिलेली आहे. व मला गावात मारले आहे असे म्हटले. पोलिसांनी त्याची वैद्यकीय तपासणी साठी यादी देवुन सरकारी दवाखाना देवणी येथे पाठविले असता, वैद्यकीय अधिकारी यांनी त्याची तपासणी करून तो मद्यार्काचे सेवन केले होते व तो मद्यार्काचे आमलाखाली होता असे प्रमाणपत्र दिले.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मुजाहीद शेख यांच्या फिर्यादीवरून देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २१/२०२३ कलम ८५(१) महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम प्रमाणे सतीश नरसींग बिरादार रा. होनाळी याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेडकाँस्टेबल विनायक कांबळे हे करीत आहेत.
