पोलीस निरीक्षक रेवनाथ डमाळे यांना निरोप तर रियाज शेख यांचा स्वागत सभारंभ
कासार सिरसी (प्रतिनिधी) : येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक रेवनाथ डमाळे यांचा निरोप तर रियाज शेख यांचा स्वागत समारंभ करण्यात आले. रेवनाथ डमाळेसाहेब यांनी या ठिकाणी तीन वर्ष उत्तम प्रकारे सेवा बजावली त्या बद्दल पंचक्रोशीतील नेते व कार्यकर्त्यांची निरोप देण्यासाठी मोठी गर्दी दिसून आले.
यावेळी पोलीस उपविभागीय डॉ, दिनेशकुमार कोल्हे साहेब निलंगा पंचायत समितीचे माजी सभापती नागनाथ पाटील, उपसरपंच बडेसाहेब लकडहारे पोलीस उपनिरीक्षक गजानन शिरसागर, कासार सिरसी ग्रामपंचायत सदस्य वीरेश चिंचनसुरे, विवेक कोकणे,सुरेश बरकंबे,नारायण डोबाळे, पत्रकार नागेशजी पंडित ज्ञानेश्वर मडोळे, संतोष डांगे , वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष युवराज जोगी, निलेश चिंचनसुरे,गिरीश चिंचनसूरे, येथील व्यापारी संघटनेच्या सर्व पदाधिकारी या भागातील सर्व पोलीस पाटील सरपंच उपसरपंच विविध क्षेत्रात कार्यरत असलेले पदाधिकारी येथे पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेकांनी साहेबांच्या कार्याबद्दल आपआपले मनोगत व्यक्त केले. या ठिकाणी कार्यरत असताना कोरोना सारख्या भयानक महामारी मध्ये सुद्धा साहेबांनी स्वतःचा जीव मुठीत घेऊन शासनाने जारी केलेली नियम पालन करत नागरिकांची हित जोपासले आहेत असे पंचायत समितीचे माजी सभापती नागनाथ पाटील यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना म्हणाले. या ठिकाणी जमलेल्या अनेक मान्यवरांनी साहेबांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करत जड अंतकरणाने साहेबांना निरोप देण्यात आले. तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
निरोप समारंभाच्या सत्काराला उत्तर देताना श्री डमाळे साहेब यांनी मी जे या पोलीस ठाणे अंतर्गत काम केलं त्या कामाची पावती आज तुम्हाला पाहून मिळाली आणि या कार्यामध्ये आपण सर्वजण मला मोलाच साथ दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभारी आहे मी आपल्याला अन्य कासार सिरसी परिसरातल्या जनतेला विसरणार नाही अशी यावेळी त्यांनी म्हणाले. आपण सर्वजण मला ही सहकार्य करा काही अडचणी असल्यास कळवा चला कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवू असे नवीन रुजू झालेले पोलीस निरीक्षक रियाज शेख यांनी म्हणाले.
