नँकला सामोरे जात असताना नियोजनपूर्वक जावे – डॉ. कमलाकर गव्हाणे
उदगीर (एल.पी.उगीले) : शासनाच्या नियमानुसार प्रत्येक महाविद्यालयाने नँकला सामोरे जाणे आवश्यक आहे. सुरुवातीच्या कालावधीमध्ये नँकला सामोरे जाणे खूप कठीण होते, पण सद्यस्थितीमध्ये त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. आपण नँकला सामोरे जात असताना नियोजनपूर्वक जाण्याची गरज आहे, असे मत उदयगिरी महाविद्यालयातील इंग्रजी विभागातील नँक समन्वयक डॉ.कमलाकर गव्हाणे यांनी मांडले.
शिवाजी महाविद्यालयातील आयक्वेशी विभागाने आयोजित केलेल्या नँकचे पुनर्मुल्यांकन करत असताना कसे सामोरे जावे? या एक दिवसीय कार्यशाळेमध्ये ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनायक जाधव हे होते, तर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती उपप्राचार्य डॉ. आर एम मांजरे, आयक्वेशीचे प्रमुख डॉ.विष्णू पवार यांची होती. यावेळी अभ्यास मंडळावर नियुक्त झालेल्या नवनिर्वाचित सदस्य डॉ एल एच पाटील, डॉ डी बी कोणाळे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ग्रंथपाल डॉ विष्णू पवार यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना डॉ गव्हाणे म्हणाले, आता आपल्याला गुणदान पद्धती कशा पद्धतीने असते? हे वेबसाईटवर पाहायला मिळत आहे. त्या पद्धतीने आपण कागदपत्र सादर करणे गरजेचे आहे. जे आपल्याकडे आहे, तेच दाखवावे. जे नाही ते दाखवण्याचा प्रयत्न करू नये. कारण चुकीच्या पद्धतीने सादरीकरण झाल्यानंतर त्याचे पुरावे जर नाही मिळाले तर आपले गुण मायनस मध्ये जाऊ शकतात. कोणत्या कार्याला किती गुण आहेत? कोणत्या कार्याला वेटेज द्यावे, कोणते कार्य दाखवण्याची आवश्यकता नाही. यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपप्रसंगी प्राचार्य डॉ. जाधव म्हणाले, यापूर्वी आपल्याला गुणदान पद्धती माहीत नसल्यामुळे कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यावे आणि कोणत्या गोष्टीला महत्त्व देऊ नये, हे समजत नव्हते. त्यामुळे खूप अडचणी येत होत्या. परंतु आता ते सोपं झालेलं आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयक्वेसी प्रमुख डॉ. विष्णू पवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्टाफ सेक्रेटरी डॉ. डी बी कोणाळे यांनी तर आभार डॉ. आर एम मांजरे यांनी मांनले.
