१ ली सखा कप राष्ट्रीय कराटे स्पर्धा उत्साहात संपन्न

१ ली सखा कप राष्ट्रीय कराटे स्पर्धा उत्साहात संपन्न

उदगीर(एल.पी.उगीले) : येथील सखा क्रीडा मंडळ आयोजित सखा कप राष्ट्रीय कराटे स्पर्धेचे आयोजन श्री हावगिस्वामी महाविद्यालय उदगीर येथील इनडोर स्टेडियम येथे करण्यात आले होते. या स्पर्धेस स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या स्पर्धेचे उद्घाटन सखा क्रिडा मंडळचे अध्यक्ष संदीप स. पवार यांचे वडील सखाराम पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी युवा उद्योजक रुपेश पालीवाल, युवा उद्योजक अमीर मलीक, हावगिस्वामी कॉलेजचे क्रिडा संचालक प्रा डॉ आर. व्ही. पाटील, उदगीरचे नामांकित डॉक्टर डॉ. नितीन गुरुडे, उदगीर येथील झि स्कूल चे संचालक सावळे , सेवानिवृत्त क्रिडा शिक्षक राजकुमार नगरे , सखा क्रीडा मंडळ चे अध्यक्ष व राष्ट्रीय पंच- संदीप स. पवार, उपस्थित होते. रुपेश पालीवाल यांनी यावेळी कराटे स्पर्धेचे महत्त्व सांगून उदगीर मध्ये प्रथमच अशा स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचे सांगितले. सखा क्रीडा मंडळ चे अध्यक्ष सेन्साई संदीप स. पवार यांचे त्यांनी कौतुक करून या स्पर्धा ऐतिहासिक ठरल्याचे सांगितले. या स्पर्धेत महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आदी राज्यांतून १७२ मुली व मुले सहभागी झाले होते.

या स्पर्धेतील विजयी खेळाडूंना मेडल, प्रमाणपत्र, देवुन गौरविण्यात आले. तसेच या स्पर्धेतील लहान गटातून चॅम्पियन ऑफ चॅम्पियन, स्पृहा राठोड, अविर देशमुख, मोठ्या गटातून चॅम्पियन ऑफ चॅम्पियन- समिक्षा सोमवंशी, अर्यन पावले, सई पवार यांना ट्रॉफी देवुन गौरविण्यात आले , तसेच विजयी प्रथम संघ औसा येथील अजित ढोले यांचा संघ व द्वितीय संघ लातूर येथील तुषार अवस्थी यांचा संघ, तृतीय महेश गिरी , व तृतीय उदगीर येथील नंदीनी धनुरे यांचा संघ , या संघास सायकल व ढाल देवुन गौरवण्यात आले.

या प्रसंगी मुख्य आयोजक संदीप स. पवार, एन.एस.कराटे स्कूल ची संचालक तथा आयोजक नंदिनी धनुरे, औसा चे मुख्य प्रशिक्षक अजित ढोले, लातूर येथील युनिवर्सल मार्शल आर्ट कराटे ऑकॉडमी मुख्य संचालक तुषार अवस्थी, प्रशिक्षक महेश गिरी, सखा क्रीडा मंडळ चे सचिव सिकंदर बा. आडे, प्रशिक्षक तथा आयोजक जिशान शेख, व राष्ट्रीय खेळाडू अनिकेत मलवाडे, गणेश चौधरी, पार्थ कुलकर्णी, कौशल भालेराव यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

About The Author

error: Content is protected !!