इनरव्हिल क्लब व व्यंकटेश स्किन केअर सेंटर तर्फे मोफत त्वचा रोग तपासणी शिबिराचे आयोजन

इनरव्हिल क्लब व व्यंकटेश स्किन केअर सेंटर तर्फे मोफत त्वचा रोग तपासणी शिबिराचे आयोजन

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील व्यंकटेश स्क्रीन केअर सेंटरच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त मोफत त्वचा रोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये अनेक त्वचा रोग व केसांच्या समस्या त्यावरील उपाय याबद्दल तपासणी व मार्गदर्शन व्यंकटेश स्किन केअर सेंटरच्या डॉ सोनल कांडगिरे यांनी केले. या शिबिराचा लाभ खूप मोठ्या संख्येने उपस्थित महिलांनी घेतला.

डॉ सोनल कांडगिरे या त्वचा रोग,गुप्त रोग व सौंदर्य समस्या तज्ञ असून त्यांचे शिक्षण MBBS,DDV(Mumbai),FAM आहे.सुंदर मी होणार या प्रत्येकाच्या स्वप्नांना साकारण्यासाठी “सौंदर्य समस्या तुमच्या, उपाय आमचे” या उद्देशाने त्या अशा विविध शिबिराचे आयोजन करत असतात. त्या इनरव्हिल क्लब, उदगीरच्या सदस्य आहेत. याचा अभिमान आहे असे मत इनरव्हिल क्लब उदगीरच्या अध्यक्षा सौ. मीरा चंबुले यांनी याप्रसंगी व्यक्त केले.या वेळी इनरव्हिल क्लबच्या सचिव सौ. शिल्पा बंडे,कोषाध्यक्ष सौ. मानसी चन्नावार, एडिटर सौ. पल्लवी मुक्कावार , प्रिया नारखेडे, पल्लवी कुलकर्णी, डॉ.प्राजक्ता गुरुडे, योजना चौधरी यांची उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!