पुणे, आंबेगाव तालुक्यातील युवती सौंदर्यवती स्पर्धेत झाली मिस फॅशन आयकॉन व मिस ताज रनर अप 2023

पुणे, आंबेगाव तालुक्यातील युवती सौंदर्यवती स्पर्धेत झाली मिस फॅशन आयकॉन व मिस ताज रनर अप 2023

पुणे (केशव नवले) : ताज इव्हेंट अँड प्रोडक्शन तर्फे मिस अँड मिसेस इंडिया 2023 या स्पर्धेची महाअंतिम फेरी पुणे येथे पार पडली. या महाअंतिम फेरीमध्ये संपूर्ण भारतातून 40 स्पर्धकांनी आपले टॅलेंट सादर केले. यामध्ये टॅलेंट राऊंड, प्रश्न-उत्तर, रॅम्प वॉक घेण्यात आले. या स्पर्धेत आंबेगाव तालुक्यातील अवसरी गावच्या प्रज्ञा शामकांत शिंदे या युवतीने मिस फॅशन आयकॉन व मिस ताज रनर अप 2023 म्हणून बाजी मारली तर अक्षता राक्षे ही प्रथम विजेती झाली. मिसेस गोल्ड विभागातून भारती पाटील, प्लॅटिनम मधून प्राची इनामदार या प्रथम विजेत्या झाल्या आहेत.

या स्पर्धेचे परीक्षक म्हणून ताज इव्हेंट्स अँड प्रोडक्शनच्या ब्रँड अँबेसिडर पिया रॉय, मराठी अभिनेत्री धनश्री बाहेकर, अभिनेता चेतन चावडा आणि डॉक्टर सागर अभीचंदाने व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिमरन पाटेकर यांनी केले. गिफ्टिंग पार्टनर अमिताज चॉकलेट, राधा बुटीक तर मेकअप पार्टनर म्हणून सरिता मेक ओव्हर यांनी काम पाहिले.

ताज इव्हेंट्स अँड प्रोडक्शन माध्यमातून हा शो परेश वैद्य यांनी आयोजित केला होता. विजेत्या स्पर्धकांना क्राऊन ट्रॉफी सर्टिफिकेट व गिफ्ट देऊन सन्मानित करण्यात आले.

About The Author

error: Content is protected !!