महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात स्मार्टस्टीक्स चे वाटप

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात स्मार्टस्टीक्स चे वाटप

उदगीर(एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय आणि डायनामिक वुमेन्स क्लब अँड फ्रेंड्स ग्रुप, अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने अंध विद्यार्थ्यांना स्मार्ट स्टीक्स आणि संमेलनातील अवाहानास प्रतिसाद देत, सर्वांनी दिलेल्या रकमेतून गणवेश वाटप करण्यात आले. डायनामिक वुमेन्स क्लब अँड फ्रेंड्स ग्रुप यांच्यातर्फे जगभरात अनेक सामाजिक कार्य केली जातात. त्याबरोबरच गरजूंना आवश्यक ती मदत उपलब्ध करून दिली जाते. भारताबाहेर राहणाऱ्या भारतीयांना वेळोवेळी पडणाऱ्या अडचणीमध्ये, त्याबरोबरच कौटुंबिक हिंसाचारामध्ये अडकलेल्या लोकांना मदत करण्यासाठी हा ग्रुप काम करतो. अ‍ॅड.हेमा अविनाश राचमाळे आणि अशोक शहा यांच्या संयुक्त प्रयत्नातून महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात हा उपक्रम संपन्न झाला. यावेळी बोलताना अ‍ॅड.हेमा राचमाळे यांनी सदरील स्मार्ट स्टीकचा वापर करून विद्यार्थ्यांना घरात आणि घराबाहेर कशी मदत होऊ शकते, त्यांना कोणतीही अडचणी येणार नाही याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्ष डॉ.रेखा रेड्डी ह्या होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवालय हासेगावचे रवी बापटले उपस्थित होते. यावेळी बोलताना रवी बापटले यांनी समाजसेवेचे महत्व समजून सांगितले, त्याबरोबरच पुढील काळात निर्माण होणाऱ्या आनंदाश्रम निर्मितीचे नियोजन स्पष्ट केले. सचिव रामचंद्र तिरुके बोलताना म्हणाले की, स्मार्टस्टिक अंध विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये मदतनिस म्हणून कार्य करणार आहे. आपण समाजातल्या अनेक घटकांसाठी निर्माण झाले आहोत असेही त्यांनी सांगितले, सदस्य डॉ.रमण रेड्डी यांनी यावेळी समाजसेवा आणि कोरोना काळातील मदत याविषयी माहिती दिली. अध्यक्षीय समारोपात डॉ.रेखा रेड्डी म्हणाल्या की, अंध विद्यार्थ्यांना स्वबळावर उभे राहण्यासाठी आमची संस्था सतत मदत करत आहे. त्याबरोबरच त्यांना समाजात वेगळे स्थान निर्माण व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. या कार्यक्रमास महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव अ‍ॅड. सूर्यप्रकाश पाटील चिघळीकर व डॉ.आर.एन.लखोटिया, प्रभारी प्राचार्य डॉ.बी.एम.संदीकर, उपप्राचार्य वरिष्ठ महाविद्यालय डॉ.आर.के.मस्के, उपप्राचार्य कनिष्ठ महाविद्यालय प्रा.सी.एम.भद्रे उपस्थित होते. पाहुण्यांचा परिचय तसेच स्मार्ट स्टीक्सचा डेमो प्रा.एस.व्ही.मूडपे यांनी करून दिला, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.एस.एम.सूर्यवंशी यांनी तर आभार प्रा.डॉ.आर.के.मस्के यांनी मानले.

About The Author

error: Content is protected !!