वैचारिक वारसा जपणारा देशच सर्वांगीण प्रगती करू शकतो – प्रा. डॉ. रामेश्वर दुडुकनाळे

वैचारिक वारसा जपणारा देशच सर्वांगीण प्रगती करू शकतो - प्रा. डॉ. रामेश्वर दुडुकनाळे

शिरूर ताजबंद (गोविंद काळे) : येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात आयोजित मोहनराव पाटील स्मृती व्याख्यामालेत पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. हे व्याख्यानमालेचे चौदावे वर्ष आहे. यावेळी प्रा. डॉ. राजेश्वर दुडुकनाळे पुढे म्हणाले, “देश म्हणजे केवळ भौतिक प्रगती नाही. वैचारिक वारसा जपताना तो सद्सद्विवेक बुध्दीने अभ्यासावा. त्याचे अनुकरण करावे.” असेही ते यावेळी म्हणाले. प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक काळात समाजाच्या विकासात अनेक महामानवांनी आपले योगदान दिले आहे. बळीराजा, भगवान गौतम बुद्ध, संत तुकाराम, संत कबीर, शहाजी राजे, राष्ट्रमाता जिजाऊ, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी राजे, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील, शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, अण्णा भाऊ साठे अशा कितीतरी महामानवांच्या कार्याचा आढावा त्यांनी यावेळी घेतला.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव, सचिव आमदार बाबासाहेब पाटील उपस्थित होते. संस्थेचे जेष्ठ संचालक साहेबराव जाधव तात्या, बळीराम भिंगोले गुरुजी, अंकुशराव कानवटे, सरपंच मच्छिंद्र वाघमारे, शिरूरचे उपसरपंच सूरजभैय्या पाटील, शिवानंद तात्या हेंगणे, प्राचार्य डॉ. दिलीप माने, उपप्राचार्य व्यंकट किर्तने, डॉ. भास्कर माने आदी मान्यवरांनी मोहनराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्जवलन करून व्याख्यानमालेच्या पहिल्या व्याख्यानाला सुरुवात केली. साहेबराव जाधव तात्या यांच्या हस्ते प्रा. डॉ. रामेश्वर दुडुकनाळे यांचा सत्कार केला. यावेळी श्रोत्यांमध्ये शिवानंद तात्या हेंगणे, मोहिब कादरी, सत्यनारायण काळे, प्रा. गोविंद शेळके, बाबुराव भोसले, अंकुशराव ढोकाडे, सतीश नवटके,अनंतराव काळे तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, महिला, विद्यार्थी तसेच अनेक सुजाण नागरिक श्रोते उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक प्राचार्य डॉ. दिलीप माने यांनी तर वक्त्यांचा परिचय डॉ. गोविंद केले यांनी करून दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. विद्या बयास तर आभार प्रा. दत्ता कानवटे यांनी व्यक्त केले.

About The Author

error: Content is protected !!