महात्मा फुले महाविद्यालयात एनडीआरएफचे रेस्क्यू प्रशिक्षण संपन्न

महात्मा फुले महाविद्यालयात एनडीआरएफचे रेस्क्यू प्रशिक्षण संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय आपत्ती निवारण (एन. डी. आर. एफ. ) दलाच्या वतीने रेस्क्यू प्रशिक्षण संपन्न झाले. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूरच्या एनएसएस विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदपूरचे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी हे होते तर प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील मुख्याध्यापक बी. आर.काबरा यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच एन.डी.आर.एफ. चे इनस्पेक्टर प्रमोद रॉय, उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. सतीश ससाणे आदींची उपस्थिती होती.

यावेळी एन.डी.आर.एफ.च्या जवानांनी हृदयरोग आल्यानंतर करायचे प्राथमिक उपचार याचबरोबर मुलांनी नाणे गिळल्यानंतर ते कसे काढायचे ?, पूर परिस्थितीत अडकलेल्या व्यक्तींना बाहेर कसे काढायचे ?, एखाद्या बिल्डिंगला आग लागल्याच्या नंतर त्यातून बचाव कसा करायचा ? याविषयीचे प्रात्यक्षिक करून दाखविले तसेच उपस्थित विद्यार्थ्यांकडून ही प्रात्यक्षिक करून घेतले. यावेळी अहमदपूरचे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी स्वतः रस्सीच्या माध्यमातून रेस्क्यू प्रात्यक्षिक करून दाखविले.सर्वप्रथम महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांनी व बी. आर. काबरा यांनी एन.डी.आर.एफ.चे जवान तसेच तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांचे स्वागत केले. या प्रशिक्षण कार्यक्रमात एन.डी.आर.एफ.चे जवान बिबीशन मोरे, मुकुंद शेळके, नवनाथ मुगळे, महादेव झेंडे, कुमार बुलंद, सुरज नलवडे, देवीदास गीते, सतीश पाटील, अनिल घुगे, सचिन कदम, किरण लांडे, ज्ञानेश्वर पाटील, महेश गौना आदी सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. एस. माने यांनी केले तर आभार एन. आर. मुसळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महात्मा फुले महाविद्यालयातील व विद्यालयातील सर्व प्राध्यापक, सर्व शिक्षक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!