नागझरी येथे जलजिवन अंतर्गत पेय जल योजनेचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्धाटन
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील नागझरी येथे जल जीवन मशीन अंतर्गत 70 लक्ष रुपयेच्या विहीर, पाईप लाईन, टाकी
पेय जल योजनेचे उद्घाटन तालुक्याचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष गावचे सरपंच रामकिशन सुर्यवंशी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन भाजपा प्रवक्ते गणेश दादा हाके यांची उपस्थिती होती
यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना करतांना गावचे उपसरपंच उध्दव ईप्पर म्हणाले की नागझरी हे गाव 185 घरांचे आहे. आतापर्यंत गावात नळाला पाणी नव्हते गावात सार्वजनिक कुंड आहे. तेथूनच डोक्यावर पाणी घेऊन जातात. गावात छोट्या मोठ्या पाण्याच्या योजना व पाईप लाईन झाल्या पण गावाला पाणी भेटले नाही. या योजेअंतर्गत आता गावाला पाणी मिळेल अशी अपेक्षा आहे.
आमची निवड फेब्रुवारी 2021 मध्ये झाली आहे, आदरणिय मंचक ईप्पर (डी आय जी) यांच्या मार्गदर्शनाखाली गावात जनसुविधे मधुन स्मशान भूमी शेड, स्मशाभूमी संरक्षण भिंत, दलीत वस्ती मध्ये पेवर ब्लॉक आणि आता पाईप लाईन होते आहे. या अगोदर गावामधे दारूबंदीचा ठराव मंजूर करून गावात दारु विकणे व पिउन गोंधळ करण्यास बंदी आहे, विधवा कुप्रथा पण बंधं करण्यात आली आहे.
आणखीन खूप कामे करायचे आहेत, पांदन रस्ते, शिव रस्ते, शाळेची भिंत, गावातील रस्ते, मंदिर हे करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.
मार्गदर्शन करताना प्रमूख पाहुणे गणेश दादा हाके म्हणाले नागझरी गाव हे संप्रदिक गाव आहे. गावात असो किंवा तालुक्यात असो कोनी पण पदावर असेल विकास कामे महत्त्वाचें आहेत. कामे ही चांगल्या दर्ज्याची झाली पाहिजेत. सध्याचे सरपंच व उपसरपंच हे तळमळीने काम करत आहेत. असे तळमळीने कामे करणारी माणसे लागतात आणि ते तुमच्या गावाला लाभले आहेत. आमचे सरकार आहे आम्ही गावाच्या विकास कामासाठी जेवढं जास्तीत जास्त निधी देता येईल तेवढा देण्यास प्रयत्न करू.
उद्घाटक आमदार बाबासाहेब म्हणले की नागझरी हे गाव नागनाथ महाराज यांच्या मुळे प्रसिद्ध आहे. माझ्या कडून जेवढी मदत करता येईल तेवढी केली आहे वरील फंड हे मंजूर करून दिले आहेत. आणखीन पण फंड देण्यास कटिबद्ध आहे. कोणते पण काम चांगल्या दर्ज्याचे झाले पाहिजे. पाईप लाईन ही कायम स्वरुपी आहे काम गुत्तेदरणी चांगल्या गुणवत्तेने करून द्यावे.
आदरणिय मंचक , आयपीएस अधिकारी या गावाला लाभले आहेत. जास्तीत जास्त चांगले कामे करून घ्या असे म्हणाले.
कार्यक्रमासाठी उजना चेअरमन शिवशंकर आगलावे, प्रशांत भाऊ भोसले , अभियंता शुभम दहिफळे, खंडळी चे सरपंच मोरे, बालेश पौळ, बंडु पौळ, विनायक पौळ, अमोल पौळ , चेअरमन अंकुश इप्पर, ग्राम विकास अधिकारी शिवाजी कोल्हे अभियंता शेकडे, गावातील सर्व नागरिक उपस्थित होते. सुत्र संचालन कलमे विष्णु कृषि साहय्यक आभार तर चंगदेव दहिफळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातली सर्व गावकरी व तरुण मंडळी यांनी केले.
