विळेगावात पाणी टंचाईमुळे मातंग समाज त्रस्त, मासचे तालुकाध्यक्ष जितेश रणदिवे आंदोलन करणार

विळेगावात पाणी टंचाईमुळे मातंग समाज त्रस्त, मासचे तालुकाध्यक्ष जितेश रणदिवे आंदोलन करणार

देवणी (रणदिवे लक्ष्मण) : देवणी तालुक्यातील विळेगावात गेल्या एक महिन्यापासून हर घर जल या योजने संदर्भात काम चालू आहे.योजना ही खरोखर चांगली आहे.पण या योजनेच्या नावाखाली पाणी टंचाईचा चुकीचा कारोबार विळेगाव ग्रामपंचायतिकडून केला जात आहे.पाणी हे आत्यावश्यक, मूलभूत गरजेतील एक गरज आहे,पाणी हे जीवन आहे,पण पाण्यावाचून जनता त्रस्त तर ग्रामपंचायत मस्त असा मनमानीचा प्रकार विळेगाव येथे घडताना दिसून येत आहे.गावातील जे आर्थिक दृष्ट्या प्रबळ आहेत तसे अर्ध्याहून अधिक लोकांकडे बोर आहेत.त्यांना या पाणीटंचाईच काहीच देण घेणं नाही.ही योजना आली काय आणि गेली काय? याचा त्यांना काहीच परिणाम होत नाही,पण यात कांही सर्वसामान्य लोक आहेत, जे आर्थिक दृष्ट्या कमकुवत आहेत.विशेषत: मातंग समाज या भीषण पाणीटंचाईचा सामना मोठ्या प्रमाणात करताना दिसून येत आहे. विळेगाव गावातील मातंग समाजाला प्रामुख्याने वर्षानु वर्षे पाणीटंचाईच्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. असे नागरिकांचे म्हणणे आहे.हर घर जल ही योजना हिताची आहे पण जो पर्यंत ही योजना पूर्णपणे आमलात येत नाही, तो पर्यंत पाणी पुरवठ्या संदर्भात कोणत्या उपाय योजना ग्रामपंचायत कडून राबवण्यात आल्या नाहीत. ज्यापासून जनतेला पाणी पुरवठा चालू राहील, हर घर जल योजनेसंदर्भातील जी कामे आहेत ती चालू करण्याअगोदर जेंव्हा या योजनेशी संबंधित अनेक काम,खोदकाम असेल, पाईपलाईन असेल किंवा इतर काम सुरुवात करण्या अगोदर पाणीपुरवठ्यात सुरुळीत चालू असावं, याच्या साठी ग्रामपंचायतकडून कोणतीही उपाययोजना राबवण्यात आली नाही.

विळेगावात पाणी टंचाई ही परमपरागत चालत आलेली जुनी प्रथा आहे.यात काही नवीन नाही.दिवसेंदिवस विज्ञान प्रगती करत आहे.दिवसेंदिवस परिवर्तन घडून येत आहे.पण विळेगावचा पाणीपुरवठा हा विषय जैसे थे तासाचं आहे,ही खूप लज्यास्पद बाब आहे.या पाणीटंचाई मुळे जनतेतून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे.या पाणी टंचाईमुळे अनेक आंदोलने केली गेली, गावस्थरावर तसेच तालुका स्थरीय आंदोलने, निवेदन, अर्ज देण्यात आले, पण विळेगाव ग्रामपंचायत मध्ये काहीच बंदलं झाला नाही.या मुळे जनतेतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

About The Author

error: Content is protected !!