शिक्षणातील गुंतवणूक देशाच्या प्रगती साठी आवश्यक – प्रा.प्रवीण जाहुरे
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनी अंतर्गत प्रा.प्रवीण जाहुरे यांचे नवीन शैक्षणिक धोरण या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. यावेळी बोलताना प्रा. जाहुरे म्हणाले, प्रगत राष्ट्रांनी शिक्षणावर प्रचंड खर्च केल्यामुळेच त्या राष्ट्रांनी नेत्र दीपक प्रगती केलेली आहे. ते आपल्याही देशात होण्यासाठी शिक्षणावरील होणारा खर्च ,खर्च न मानता गुंतवणूक समजून केल्यास त्याचे परिणाम येणाऱ्या अनेक पिढ्यांना मिळू शकतात. यासाठी सरकारांनी शैक्षणिक गुंतवणूक करणे अत्यंत आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी नवीन शैक्षणिक धोरणा अंतर्गत शैक्षणिक आयोग व शैक्षणिक इतिहास, अंतरविद्याशाखीय दृष्टिकोन, परदेशी विद्यापीठ आणि त्यांची उपलब्धता, तंत्रज्ञान आणि भविष्य, क्लस्टर विद्यापीठ प्रस्ताव, पदवी प्राप्तीसाठी मुक्त प्रवेश, श्रेयांक गुणदान पद्धत, शैक्षणिक गळतीवर उपाय प्रत्येक वर्षी वेगळे प्रमाणपत्र, दोन विद्यापीठाच्या संयुक्त पदवी, , मुल्य शिक्षण या बाबीवर माहिती दिली. यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ.बी.एम.संदीकर, उपप्राचार्य (व.म.) डॉ.आर.के.मस्के, उपप्राचार्य (क.म.)प्रा.सी.एम.भद्रे, स्टाफ सेक्रेटरी प्रा.डॉ.जे.एम.पटवारी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ.आर.के.मस्के यांनी केले तर आभार प्रा.डॉ.जे.एम.पटवारी यांनी मानले.
