युवा तरंग-2023′ स्नेहसंमेलनात तरुणाईचा
उत्साह शिंगेला

युवा तरंग-2023' स्नेहसंमेलनात तरुणाईचा<br>उत्साह शिंगेला

उदगीर(एल.पी.उगीले) : येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ,उदगीर संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालयात ‘आजादी का अमृत महोत्सव’ व संस्थेच्या रौप्य महोत्सवा निमित्त “युवा तरंग-2023” स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर जगताप होते तर उदघाटन आय टी एम कॉलेज नांदेड येथील प्राचार्य डॉ. सूर्यकांत थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.तर प्रमुख पाहुणे म्हणून लोकप्रिय मिमिक्री किंग सतीश कासेवार(चला हवा येऊ द्या फेम) यांची उपस्थिती होती.

यावेळी व्यासपीठावर स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे शैक्षणिक संचालक डॉ. उमाकांत पाटील, कृष्णा गथडे, प्राचार्य गणेश तोलसरवाड,प्राचार्य ज्योती स्वामी-तारे,प्राचार्य नागेसन तारे, उपप्राचार्य तथा IQAC समितीचे समन्वयक प्रा. डॉ. धनंजय गोंड, प्राचार्य डॉ. गोपाळ पवार ,डॉ. एस. एन, जाधव, संजय हट्टे,अतेंद्र सिंग, नुतन नाईक,मनोरमा शास्त्री,ज्योती स्वामी, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. अमर तांदळे, पत्रकारिता व माध्यमशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.राहुल पुंडगे, प्रा.आकाश कांबळे,.प्रा. राशिद दायमी, प्रा. हणमंत सूर्यवंशी,प्रा.डॉ.चव्हाण एस.एन,प्रा.नयन भालेराव,प्रा. सोनल सोनफुले, प्रा. ऋतुजा दिग्रसकर, प्रा. शुभांगी शिंदे,प्रा. असिफ दायमी,वैष्णवी चित्ते,वैष्णवी गुंडरे,अमोल भातकुळे,अंकिता तोटरे,अपर्णा काळे यांची उपस्थिती होती.

या स्नेहसंमेलनात ‘आजादी का अमृत महोत्सव’ हा विषय विद्यार्थ्यांना कलाविष्कारासाठी ठेवण्यात आला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर एका पेक्षा एक सरस असे कलाविष्कार सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. यासोबतच विद्यार्थ्यांनी लोकगीत, चित्रपट गीत, यावर वयक्तिक व सामूहिक कला सादर केली. सुरवातीला ‘युवा तरंग 2023’ निमित्त महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.विजेत्या स्पर्धाकाला मान्यवराच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. स्नेहसंमेलनाचे उदघाटक डॉ.सूर्यकांत थोरात यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,विद्यार्थ्यांनी स्वतःहून आपणच आपली वाट निवडली पाहिजे.यश भेटत नाही तर यश प्राप्तीसाठी मेहेनत करावी लागते. आजचं युग हे स्पर्धेचे युग आहे, या स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध विषयात ज्ञान प्राप्त करावे.आपल्याला शिकविणाऱ्या गुरूचा नेहमी आदर करावा, असे ते म्हणाले.

याप्रसंगी स्नेहसंमेलनाचे अध्यक्ष डॉ. सुधीर जगताप असे म्हणाले की,आपल्या महाविद्यालयात विद्यार्थीना रोजगाराभिमुख शिक्षण दिले जाते. त्यासाठी वेग वेगळे कौशल्य आत्मसात करणे विद्यार्थीनी गरजेचे आहे. त्यासाठी आपल्या अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त देखील अभ्यास करावा.
या स्नेहसंमेलनाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा.डॉ. धनंजय गोंड यांनी केले. त्यांनी आपल्या मनोगतात महाविद्यालयाच्या वाटचाली आणि यशस्वीतेचा आलेख मांडला. ते बोलताना म्हणाले की, आमच्या महाविद्यालयात आज घडीला वेगवेगळ्या कौशल्यावर आधारित असे एकोणीस अभ्यासक्रम चालतात. जे रोजगाराभिमुख आहेत.तसेच यावर्षी महाविद्यालय NAAC साठी सामोरे जात आहे, त्याची तयारी पूर्ण झाल्याची माहिती ही त्यांनी दिली.
सूत्रसंचालन प्रा. अमर तांदळे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. ऋतुजा डिग्रसकर व प्रा.सोनल सोनफुले यांनी करून दिला.तर आभार डॉ. शेषनारायण जाधव यांनी मानले.

About The Author

error: Content is protected !!