विकासाची दृष्टी असलेल्या नेतृत्वाचा लाभ घेत आतनूरचा कायापालट! चंद्रशेखर पाटलाची कर्तबदारी

विकासाची दृष्टी असलेल्या नेतृत्वाचा लाभ घेत आतनूरचा कायापालट! चंद्रशेखर पाटलाची कर्तबदारी

आतनूर (एल.पी.उगीले) : उदगीर विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आणि विकासाची दूरदृष्टी असलेले लोकप्रतिनिधी माजी गृहराज्यमंत्री तथा उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे यांच्या कार्यतत्परतेचा योग्य फायदा उचलत, आपल्या गावचा सर्वांगीण विकास करून घेण्यामध्ये आतनूर येथील युवा नेते चंद्रशेखर पाटील यांनी नागरी सुविधांना प्राधान्य देत आपल्या गावातील विकास कामे करून दाखवले आहेत.

“शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी” असे म्हणतात. त्याचा प्रत्यय चंद्रशेखर पाटील यांनी कृतीत आणून दाखवला आहे. अशोकराव पाटील आतनूरकर यांच्या राजकीय कामगिरीचा वारसा उचलत तरुण वयातच चंद्रशेखर पाटील यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे. आपल्या गावातील सर्वसामान्य माणसाला शासकीय योजनांचा लाभ झाला पाहिजे. यासोबतच तरुण वयात ग्रामस्थांनी आपल्याला सरपंच म्हणून निवडून दिल्यामुळे गावाच्या विकासाची नैतिक जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन मोठ्या धाडसाने ग्रामस्थांनी दिलेल्या संधीच सोनं करत चंद्रशेखर पाटील यांनी आतनूर गावाचा कायापालट करायला सुरुवात केली आहे.

विकासाची दृष्टी असलेल्या नेतृत्वाचा लाभ घेत आतनूरचा कायापालट! चंद्रशेखर पाटलाची कर्तबदारी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा आघाडीचे नेतृत्व करत असतानाच, जळकोट तालुक्यामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात देखील चंद्रशेखर पाटील यांना चांगले यश आले आहे. संपूर्ण विधानसभा मतदारसंघांमध्ये विकासाचे वारे वाहत असताना आपल्याही भागांमध्ये ही विकासाची गंगा आली पाहिजे. विकासासाठी सदैव तत्पर असलेले लोकप्रतिनिधी माजी गृहराज्यमंत्री तथा उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांचे निकटवर्ती असून देखील आपण जर आपल्या भागात विकास करू शकलो नाही तर, जनता आपल्याला माफ करणार नाही. असा विचार करून जळकोट तालुक्यातील विकासामध्ये सिंहाचा वाटा उचलत चंद्रशेखर पाटील यांनी अनेक गावातून शासकीय योजना प्रत्यक्ष राबवल्या गेल्या पाहिजेत. त्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ही बाब उल्लेखनीय आहे.

संपूर्ण मतदारसंघातील प्रत्येक गावात जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठ्याचा प्रश्न हाती घेऊन जवळपास 600 कोटी रुपयांचा निधी आमदार संजय बनसोडे यांनी मंजूर करून आणला आहे. कधीकाळी डोंगरी तालुका म्हणून जळकोट तालुक्याला ओळखले जात होते, हे चित्र बदलावे म्हणून या भागातील नागरिकांनी लोकप्रतिनिधी कडे मागणी केली होती.  डोंगरी तालुक्याचा कलंक पूर्णपणे पुसून काढण्याचा आणि या तालुक्याचा देखील सर्वांगीण विकास झाला पाहिजे. अशी आग्रही भूमिका घेऊन आमदार संजय बनसोडे यांनी विकासाची गंगा खेचून आणली आहे. जळकोट तालुक्यातील प्रत्येक गावातून जलजीवन मिशन योजना आल्यामुळे लवकरच सर्व गावातील पाणीपुरवठा सुरळीत होईल.

आया बहिणींना आता पाण्यासाठी वणवण भटकंती करायची वेळ येणार नाही. पिण्याच्या पाण्याची टंचाई ही बाब आता पूर्णपणे विसरता येऊ शकेल. एवढे मोठे कार्य आमदार संजय बनसोडे यांनी केले आहे. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि राबवणूक झाली पाहिजे. याचाही अट्टाहास चंद्रशेखर पाटील यांनी आपल्या भागात चालू ठेवला आहे.

जळकोट तालुक्यातील नागरिकांच्या मूलभूत सुविधा त्यांना प्राप्त झाल्या पाहिजेत, पाणी व्यवस्थापना सोबतच ग्राम पातळीवर विद्युत पुरवठा, स्वच्छता, आरोग्य या बाबींचाही विचार करून ज्या ज्या विभागातून लोकप्रतिनिधींनी विकास निधी खेचून आणला आहे. त्या त्या विभागाची कामे योग्य पद्धतीने झाली पाहिजेत. याचाही अट्टाहास चंद्रशेखर पाटील यांनी धरला आहे. विकास महर्षी माजी गृहराज्यमंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या दूरदृष्टीचा आणि विकास करण्याची क्षमता याचा फायदा आपल्या भागात झाला पाहिजे. यासाठी चंद्रशेखर पाटील ज्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत, असेच प्रयत्न इतर सर्व युवक कार्यकर्त्यांनी घेतल्यास निश्चितपणे विकासाला प्रचंड गती येईल. यात शंका नाही. कोणत्याही गोष्टीसाठी विकास म्हटले की निधी कमी पडणारच नाही, इतका खंबीर नेता उदगीर विधानसभा मतदारसंघाला भेटल्यामुळे त्यांच्याकडून काम करून घेणे ज्यांना जमले, त्या भागाचा निश्चितपणे कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. असे आता सर्वसामान्य नागरिकही बोलू लागले आहेत.

About The Author

error: Content is protected !!