योग वेदांत सेवा समिती तर्फे विद्या वर्धिनी हायस्कूल मध्ये वृक्षारोपण

योग वेदांत सेवा समिती तर्फे विद्या वर्धिनी हायस्कूल मध्ये वृक्षारोपण

उदगीर(एल.पी.उगीले) : रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित साधून विद्या वर्धिनी हायस्कूलमध्ये योग वेदांत सेवा समिती उदगीर यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विद्या वर्धिनी हायस्कूलचे मुख्याध्यापक बी.बी नागरवाड, योग वेदांत सेवा समितीचे उपाध्यक्ष चंद्रशेखर महेंद्रकर, युवा संघाचे उपाध्यक्ष नामदेव आपटे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पी.व्ही अजने, किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे ओ.एस चंद्रकांत जाधव, अनुप मोरे, बंडू पाटील लोणीकर ,बि.व्ही बिरादार,कलाशिक्षक एन. आर जवळे,सुदर्शन बिरादार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेख महबूब, शिवाजी बिरादार,तुळशीदास बुरशे, अनिरुद्ध बिरादार,योगेश बसपुरे, अनुप मोरे,मारुती काळे, अशोक शिंदे,महेश हुडगे, कुणाल मरेवार,सोनू सोमवंशी,मीरा हुडगे, सविता मळगे, विमल नळगिरे, पंचफुला पुदाले यांनी परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!