बालविवाह प्रतिबंध कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा – अॕड. संजय सेंगर
देवणी(रणदिवे लक्ष्मण) : देवणी येथे पंचायत समिती सभागृह दि,९/२/२०२३ रोजी निर्धार समानतेचा बालविवाह प्रतिबंध कार्यशाळा आयोजन ग्रामीण महिला विकास संस्था देवणी यांच्या वतीने करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश घोळवे तहसीलदार , ॲड. संजय सेंगर, सदस्य महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग मुंबई,राधाकृष्ण देशमुख लातुर बालकल्याण अध्यक्ष, कांबळे व्हि,एस सहा. गटविकास अधिकारी, सौ सुवर्णा दुरुगकर प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास देवणी,सौ कुशावर्ता बेळे अध्यक्षा ग्रामीण महिला विकास संस्था, गिरीश सबनिस, प्रकल्प समन्वयक, सदाशिव पाटील तळेगावकर सरपंच संघटना तालुकाध्यक्ष, प्रेरणा जाधव तालुका समुपदेशन केंद्र,कचराताई गायकवाड प्रकल्प समन्वयक, अनिल कांबळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक, तुकाराम पाटील, गोरे एस आर ग्रामसेवक, मनिषा गायकवाड माजी सरपंच,आदि मान्यवरांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले, अॕड संजय सेंगर यांनी बोलताना सांगितले कि, बालविवाह प्रतिबंध कायद्याचे नियम, माहीती समजून घेऊन गावपातळीवर जनजागृती करण्यात यावी. तसेच बालविवाह प्रतिबंध कायद्याचे काटेकोर पालन करावे, असे सांगितले. यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. विकास बिरादार, नागनाथ सुर्यवंशी, कृष्णा इंगोले, विजयश्री बोचरे,सरोजा शिंदे, सत्यशिला सरवदे, सुखवास इसाळे, पत्रकार रणदिवे लक्ष्मण,गटप्रवर्तक रेखा लांडगे,शामला वाडेकर, आम्रपाली सुर्यवंशी, अनुराधा कोनाळे, यशवंत कांबळे ,सुमन काळे,अनुरथ मेळकुंदे सरपंच,कमल बिरादार आशा कार्यकर्ती, अंगणवाडी कार्यकर्ती दैवशाला कांबळे, सरोजा गायकवाड, तनुजा चरपल्ले, रेखा बिरादार, मंगलताई जोशी, अयोध्या सुर्यवंशी, प्रेरक माधव सुर्यवंशी, मुकेश कांबळे, नवनाथ सुर्यवंशी, परमेश्वर मामडे, बालाजी गायकवाड, दत्ता बिरादार, पंचफुला सुर्यवंशी, विस गावातील प्रेरक, प्रेरिका, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी कार्यकर्ती, सरपंच, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
