मध्यप्रदेश येथे झालेल्या खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये महाराष्ट्राचा पुन्हा दबदबा
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील तलवारबाजी खेळातील खेळाडू माही किशोर आरदवाड हिने इपी खेळ प्रकारामध्ये कॉटर फायनल मध्ये कर्नाटकाच्या खेळाडूला १३ – १४ ने मात करून सेमी फायनल मध्ये प्रवेश मिळाला व सेमी फायनल मध्ये जानवी जाधव हिला १० – १५ ने मात करून फायनल मध्ये प्रवेश मिळवला व रैप्य पदक पटकवले आहे. तसेच जानवी गणपतराव जाधव हिने मणिपूरच्या खेळाडूला प्रिकॉटर मध्ये ५ – ४ ने मात करून कॉटर फायनल मध्ये प्रवेश मिळाला आणि मध्यप्रदेशच्या खेळाडूला १० – १५ ने मात करत कांस्यपदक पटकवले आहे या दोन्ही अहमदपूर मधील खेळाडूंचं अभिनंदन पृथ्वीराज बी .पी. (जिल्हाधिकारी लातूर) सुधीर मोरे (क्रीडा उपसंचालक, लातूर विभाग ) जगन्नाथ लकडे (जिल्हा क्रीडा ,अधिकारी लातूर) जयराज मुंडे राज्य क्रीडा मार्गदर्शक( क्रिकेट ) डॉ.प्रा.अभिजीत मोरे अध्यक्ष लातूर जिल्हा तलवारबाजी संघटना व सर्व सदस्य (शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त) प्रा. दत्ता गलाले (सचिव) तलवारबाजी संघटना बालाप्रसाद काबरा मु.अ.महात्मा फुले विद्यालय अहमदपूर, व्ही.व्ही .गंपले मु.अ. यशवंत विद्यालय अहमदपूर, प्रशांत माने मु.अ. अहिल्यादेवी मा. विद्यालय अहमदपूर, कुलदीप हाके संचालक सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूल रूद्दा, ज्ञानोबा भोसले संचालक किलबिल नॅशनल स्कूल जवळगा तसेच वजीरोद्दीन काजी (NIS), वैभव कज्जेवाड, मोसिन शेख (NIS), आकाश बनसोडे (NIS), कदम संतोष, रोहीत गलाले, मैफूजखान पठाण व सर्व क्रीडाप्रेमी नागरिकांनी केले आहे.
