मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

लातूर (प्रतिनिधी) : लातूर तालुक्यातील मौजे चिंचोली बल्लाळनाथ येथे बाळासाहेबांची शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांचा जन्मदिवस जिल्हाप्रमुख ॲड बळवंतभाऊ जाधव साहेब यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करुन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांची आरोग्य विषयक सर्व तपासणी करून त्यांना सकष आहाराचे मार्गदर्शन बावणे सर यांनी केले. विद्यार्थ्यांनी आई वडीलांचा, गुरुजनांचा आदर करावा. स्पर्धात्मक परिक्षेमध्ये सहभाग घेऊन आपल्या गावाचे नावलौकिक करावे असे आवाहन राजकुमार सुरवसे यांनी विद्यार्थ्यांना केले. यावेळी तालुकाप्रमुख राजकुमार सुरवसे, ग्रामपंचायत सदस्य विश्वास कावळे, इंद्रजीत नवले, वैद्यकीय अधिकारी बावणे साहेब, रावसाहेब जाधव, जगन्नाथ भालेकर, वैद्यकीय मदत कक्ष समन्वयक पंडीत कणसे, शालेय समिती अध्यक्ष संजय भडंगे, मुख्याध्यापक डोंगरे सर, आरोग्य कर्मचारी प्रकाश चांगण, सय्यद सर, शिंगणाथ सर, धोत्रे मॅडम, सांळुके मॅडम, राऊत मॅडम, डोंगरे मॅडम, शिवलिंग भडंगे, हनुमंत शिंदे, पवन भडंगे, अविनाश काळे, आशा कार्यकर्ती उषा गायकवाड आदी सर्व उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!