दिल्ली येथील प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी योगेश पोटभरे यांचा दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने सत्कार संपन्न

दिल्ली येथील प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी योगेश पोटभरे यांचा दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने सत्कार संपन्न

दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने दिल्ली येथील प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी योगेश पोटभरे यांस दहा हजार रुपयांची शिष्यवृत्ती बहाल

लातूर (प्रतिनिधी) : दयानंद शिक्षण संस्था संचलित दयानंद कला महाविद्यालय लातूर येथील राष्ट्रीय छात्र सेना विभाग व 53 महाराष्ट्र एनसीसी बटालियन लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिन संचलन, दिल्ली येथील सहभागी झालेल्या एनसीसी कॅडेट योगेश पोटभरे यांचा सत्कार गुरुवार दि.09 फेब्रुवारी 2023 रोजी दयानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते. यात योगेश पोटभरे (बी.ए. तृतीय) यांने नवी दिल्ली येथे आयोजित 73 व्या प्रजासत्ताक दिन कर्तव्य पथ संचलनात महाराष्ट्र राज्य संघात सहभागी राहून महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले. यात महाराष्ट्र संचालनालयाच्या तुकडीने सलग दुसऱ्या वर्षी प्रजासत्ताक दिन शिबिर (RDC)-2023 येथे चॅम्पियन्स ट्रॉफीचा मानकरी ठरला.या यशाबद्दल दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमात कॅडेट योगेश पोटभरे यांनी असे प्रतिपादन केले की दिल्ली आरडी परेड ही माझ्या जीवनातील एक अस्मरणीय आठवण असून दिल्ली आरडी परेड निवडीसाठी मला अथांग परिश्रम व कठीण अशा सरावातून पुढे जावे लागले. दिल्ली येथे अथक परिश्रमातून मला प्रजासत्ताक दिनी संचलनात सहभागी होण्याची संधी प्राप्त झाली ही संधी दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य व लेफ्टनंट विवेक झंपले यांचे आभार व्यक्त केले. तर 53 महाराष्ट्र एनसीसी बटालियन लातूर कमांडिंग ऑफिसर कर्नल एच.ए.जोशी यांनी याप्रसंगी असे प्रतिपादन केले की दिल्ली येथे होणाऱ्या संचलना महाराष्ट्रातून 111 ची निवड करण्यात आली होती यातील एक कॅडेट म्हणजे योगेश पोटभरे होता. त्याने अत्यंत कठीण परिश्रमातून दिल्ली आरडी संचलनात सहभाग नोंदवला आहे. या यशाबद्दल त्याचे अभिनंदन याप्रसंगी त्यांनी केले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. लक्ष्मीरमणजी लाहोटी यांनी योगेश पोटभरेच्या या यशाबद्दल त्याला पुढील शिक्षणासाठी दहा हजार रुपये प्रति वर्ष शिष्यवृत्ती मंजूर करून गौरव केला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.लक्ष्मीरमणजी लाहोटी, संस्था सचिव मा.श्री.रमेशजी बियाणी, कमांडिंग ऑफिसर कर्नल एच.ए.जोशी, मा.श्री.नरेश पंड्या आणि मा. दत्तात्रय लोखंडे, प्राचार्य डॉ शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य डॉ प्रशांत मान्नीकर उपप्राचार्य अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ दिलीप नागरगोजे, लेफ्टनंट कर्नल संतोषकुमार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात देशभक्तीपर गीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य शिवाजी गायकवाड यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.गोपाल बाहेती व डॉ सुनिता सांगोले यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ मच्छिंद्र खंडागळे यांनी मांडले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लेफ्टनंट विवेक झंपले, डॉ.संदीपान जगदाळे, डॉ.अशोक वाघमारे, डॉ. मच्छिंद्र खंडागळे, डॉ सुनिता सांगोले, डॉ.नितीन डोके, डॉ.शिवकुमार राऊतराव, प्रा.विलास कोमटवाड,प्रा.सुरेश क्षीरसागर, प्रा.जिगाजी बुद्रुके, प्रा.सुधीर गाढवे, प्रा.दशरथ ननवरे, प्रा.महेश जंगापल्ले, प्रा. सचीन पतंगे यांनी परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!