देवणी खुर्द येथे रमाई घरकुल पंतप्रधान आवास योजनेंतर्गत योजना लाभार्थींना भेट
देवणी (रणदिवे लक्ष्मण) : देवणी तालुक्यातील देवणी खु येथे कट्टेवार ए,डी विस्तार अधिकारी प.स. देवणी,त्रिपती पि.एम.आरोग्य विस्तार अधिकारी प.स. देवणी, सरपंच यशवंत कांबळे, पत्रकार रणदिवे लक्ष्मण यांच्या उपस्थितीत रमाई घरकुल लाभार्थीं रणदिवे रामकिशन, रणदिवे रंगराव यांना भेट दिली. योजनेचे चांगल्या प्रकारे काम सध्या चालू आहे, म्हणून रामकिशन रणदिवे व रंगराव रणदिवे यांचा सत्कार कट्टेवार ए.डी.यांनी केला. तसेच ज्यांनी काम रमाई घरकुल व पंतप्रधान आवास योजनेंतर्गतचे काम बंद ठेवलेले लाभार्थींना सांगितले की, लवकरात लवकर काम चालू करा. सरपंच यशवंत कांबळे, मल्लिकार्जुन रणदिवे, सुखवंत रणदिवे, शंकर रणदिवे, प्रकाश मेह्त्रे,आदि उपस्थित होते.
