मंथन पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

मंथन पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : शैक्षणिक गुणवत्तेसह विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे मंथन पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन विशाल फंक्शन हॉलमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऍड.पवन कोणे हे होते, तर उदघाटक म्हणून लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे यांची उपस्थिती होती.तर मंचावर केंद्रप्रमुख बालाजी धमनसुरे, उदगीर, जळकोट, देवणी शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन माधव अंकुशे, साहित्यिक अनिता येलमटे, संचालक सोमनाथ अंकुशे, प्राचार्या सुवर्णा पाटील यांची उपस्थिती होती.

प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शाळेच्या प्राचार्या सुवर्णा पाटील यांनी प्रास्ताविक केले. त्यात शाळेच्या प्रगतीचा आढावा सादर केला. त्यानंतर उदघाटक, ॲड. पवन कोणे, केंद्रप्रमुख धमनसुरे,बालाजी अनिता येलमटे यांनी विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले.स्नेहसंमेलना निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, कोळी गीत, पंजाबी गीत, भक्ती गीत ,लावणी नृत्य आदींचे सामूहिक आणि वैयक्तिक नृत्य सादर केले.कार्यक्रमाचे संचलन प्रतीक्षा लोहकरे हिने केले, तर आभार सोनाली अंकुशे यांनी मानले.कार्यक्रमास विद्यार्थ्यांसह पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंथन पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास विविध उपक्रमाच्या माध्यमातून होत असल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त केले.

About The Author

error: Content is protected !!