जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोनाळी येथे वार्षिक स्नेह संमेलन संपन्न
देवणी (रणदिवे लक्ष्मण) : जि.प.प्रा.शा.कोनाळी ता.देवणी येथे वार्षिक स्नेह संमेलन घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्य.समितीचे अध्यक्ष गुणाजी भागुराम बिरादार हे होते.प्रमुख अतिथी दशरथ माने सरपंच कोनाळी , वैजनाथ बिरादार उपसरपंच कोनाळी,पांडुरंग चामले चेअरमन कोनाळी,गोविंदराव पाटील तंटामुक्ती अध्यक्ष कोनाळी,विष्णु भोळे उपाध्यक्ष शा.व्य.स.कोनाळी,मुन्ना जहागिरदार ,आचमे विजयकुमार मुख्याध्यापक कोनाळी हे होते.
अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजनकरुन दीप प्रज्वलनाने स्नेह संमेलनाचे उदघाटन करण्यात आले. प्रा.शा.कोनाळी च्या बाल चमूने इतिहासाचे रंगरुप या स्वागत गिताने मान्यवरांचे व उपस्थितांचे स्वागत केले.यानंतर इयत्ता१ ली ते ७ वी च्या विद्यार्थ्यानी विविध कलागुण सादर केले, वार्षिक स्नेह संमेलनात सहशिक्षक मिरकले नरसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली स्री भ्रुण हत्या,निर्मल ग्राम, शेतकरी आत्महत्या या विषयावर आधारीत “जीवन मोलाचे “ही नाटीका सादर करण्यात आली.यावेळी गावातील नरसोबा बिरादार,सतीश बिरादार, राहुल पाटील यांच्या वतीने सर्वासाठी अल्पोपहार म्हणून खिचडी वाटप करण्यात आली.या कार्यक्रमास ग्रामस्थांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.बाल चिमुकल्यांच्या कलागुणांचे व शिक्षकांच्या सुयोग्य नियोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन किशनराव बिरादार,शिवाजी टिळे,श्रीमती रेशमा सय्यद यांनी केले. आभार श्रीमती टाकेकर अदिती टाकेकर यांनी केले कार्यक्रम यशस्वितेसाठी बाबू भंडे,गणेश बेळकट्टे व समस्त ग्रामस्थ यांनी प्रयत्न केले.
