लाल बहादूर शास्त्री प्राथमिक शाळेत प.पू.गोळवलकर गुरुजी जयंतीनिमित्त कार्यक्रम संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई संचलित लाल बहादूर शास्त्री प्राथमिक विद्यालयातील दोन्ही विभागात द्वितीय सरसंघचालक प.पू.गोळवलकर गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी केलेल्या कार्याची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, म्हणून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी अध्यक्षा म्हणून सौ.सविता जामखंडे,तर प्रमुख मार्गदर्शिका म्हणून विभाग प्रमुख सुरेखाबाई कुलकर्णी उपस्थित होत्या, तसेच तिसरी, चौथी विभागात अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे तर, प्रमुख मार्गदर्शक म्हणून माधव केंद्रे व प्रमुख पाहुणे म्हणून विभाग प्रमुख सुधाकर पोलावार उपस्थित होते.
व्यासपीठावरील मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.शाळेच्या वतीने पुष्प देऊन मान्यवर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक सुरेखाबाई कुलकर्णी यांनी प.पू.गोळवलकर गुरुजींनी सरसंघचालक म्हणून राष्ट्रासाठी केलेल्या महान कार्याची ओळख विविध प्रसंग सांगून विद्यार्थ्यांना करून दिली.गुरुजींची साधी राहणी व उच्च विचारसरणी होती.सर्वोतोपरी राष्ट्र मानून आयुष्यभर संघ कार्याला वाहून घेतले.असे मार्गदर्शन केले,माधव केंद्रे यांनी गुरुजींचे बालपण,शिक्षण व संघकार्य याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.स्वामी अखंडानंद महाराजांनी त्यांना राष्ट्र देवो भव:असा आशिर्वाद देऊन राष्ट्रसेवेसाठी अखंड प्रवास करशील असा आशिर्वाद दिला होता.त्याप्रमाणे प.पू गोळवलकर गुरुजी त्यांच्या ३३ वर्षाच्या आयुष्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी संपूर्ण भारतभर भ्रमण केले, व शाखा वाढवण्याचे काम केले.संघ म्हणजे काय?शाखा म्हणजे काय? याबद्दल सविस्तर खूप छान प्रकारे मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोपपर भाषणात सौ.सविता जामखंडे यांनी संघ कार्याचा विशाल वटवृक्ष उभा करण्यासाठी द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर यांनी १९४० ते १९७३ या ३३ वर्षाच्या काळात वर्षातून दोन वेळा प्रवास केला.संघकार्याचा विशाल वटवृक्ष वेगवेगळ्या माध्यमातून उभा केला. मुलांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन देशसेवेसाठी सदैव तत्पर रहावे, असे आवाहन केले.
मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांनी आपल्या भाषणात गोळवलकर गुरुजी लहानपणापासू हुशार व कुशाग्र बुध्दीचे होते.उच्च शिक्षण झाल्यावर त्यांचा अध्यात्मिक जीवनाकडे अधिक कल होता.हिंदू विश्व विद्यालयात त्यांनी प्राणीशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले होते.१९४० साली गोळवलकर गुरुजींकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक म्हणून दायित्व देण्यात आले.त्यांनी संपूर्ण आयुष्य संघासाठी घालवले.आपणही त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन राष्ट्रसेवेसाठी सदैव तत्पर रहाण्याचे आवाहन केले.
सुत्रसंचलन सौ.सोनिया देशपांडे व सौ.भाग्यश्री स्वामी यांनी सुत्रसंचलन केले.आभार सौ.सुनिता कांबळे यांनी मानले.
