वाढवण्याचा ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालयात येत नसल्यामुळे गावात अनेक समस्या
वाढवणा बु. ( हुकूमत शेख ) : वाढवणा बु येथील ग्रामपंचायत मध्ये 17 सदस्य असुन 7 पुरुष व 10 महिला सदस्य असुन देखील आपआपल्या वार्डातील नाल्या सफाई कडे व पाईप लाईन फुटून पाणी वाया जात आहे, अनेक जागी व्हॉल लिकेज होऊन पाणी वहात असुन त्या पाण्यात डुकरे, कुत्रे, शाळकरी मुले, मुली पाय घालुन जात आहेत, मात्र निवडून आलेल्या सदस्यांचे लक्ष ग्रामस्थांच्या समस्या कडे दिसत नाही. तसेच ग्रामसेवक नोकरीच्या ठिकाणी राहात नाही. अनेक दिवस झाले कार्यालयात पण येत नाहीत. या मुळे गावातील ग्रामस्थांची कामे खोळंबली आहेत, गावात ग्रामसेवक येत नसल्यामुळे गावातील मेन रोड व गल्ली बोळातील नाल्या अनेक महिन्यापासून सफाई करण्यात आली नाही. अनेक ठिकाणाच्या व्हॉल लिकेज आहेत. त्यात डुकरे, कुत्रे व लहान मुले देखील पाय घालुन जाताना दिसत आहेत. या मुळे पाणी दूषित होऊन पाण्यामुळे रोगराई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावात अनेक समस्या आहेत, मात्र या बाबीकडे लक्ष देऊन काम करणारा शासकीय ग्रामसेवक नसल्याने जिल्हा परिषद व केंद्रीय प्राथमिक शाळेच्या क्रिडांगणावर देखील घानीचे साम्राज्य व डुकरांचा सुळसुळाट झाला आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य देखील धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामसेवक नसल्यामुळे विध्यार्थ्यांना घाणीचा व दुर्गधींचा सामना करावा लागत आहे.गावात अनेक समस्याचा सामना गोरगरीब नागरिकांना करावा लागत आहे. एवढी सतरा सदस्यांची ग्रामपंचायत असुन गावाकडे लोकप्रतिनिधीचे लक्ष नाही. दोन महिन्या पासुन पोलीस ठाणे जवळील हात पंप बंद पडला असुन कोणीच लक्ष देऊन हात पंप दुरुस्ती करीत नसल्याने भक्तांना पूजेला पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अशा अनेक समस्या असुन देखील उदगीर गटविकास अधिकाऱ्याचे लक्ष दिसत नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालुन वाढवणा येथील ग्रामपंचायत कार्यालयात लवकरात लवकर ग्रामसेवक पाठवून द्यावे, व नागरिकांना होणाऱ्या समस्याचा निपटारा लवकरात लवकर करून स्वछ पाणी निर्मळ गाव करण्यासाठी त्वरित ग्रामसेवकाची नियुक्ती करावी. गावातील गैरसोय दुर करण्याची मागणी जनतेतून होताना दिसत आहे.
