दयानंदच्या मेघराज शेवाळे याची राष्ट्रीय युवा संसद 2023 साठी निवड

दयानंदच्या मेघराज शेवाळे याची राष्ट्रीय युवा संसद 2023 साठी निवड

दिल्ली येथे संसद भवनात महाराष्ट्र व गोवा राज्याचे करणार प्रतिनिधित्व
लातूर (प्रतिनिधी) : युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय भारत सरकार आणि नेहरू युवा केंद्र यांच्या वतीने दिनांक 23 व 24 फेब्रुवारी रोजी आयोजित ‘राष्ट्रीय युवा संसद उत्सव 2023 साठी जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ओळख असलेल्या दिल्ली येथे संसद भवनात महाराष्ट्र व गोवा राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी शेवाळे मेघराज दत्तात्रय याला भारत सरकारकडून आमंत्रण आले आहे. मेघराज शेवाळे हा दयानंद कला महाविद्यालय लातूर येथे बीए प्रथम वर्षामध्ये शिक्षण घेत आहे. तो मूळचा अंबाजोगाई तालुक्यातील वाघाळा या गावचा रहिवाशी आहे. त्याने आतापर्यंत अनेक राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व व वाद-विवाद स्पर्धेमध्ये यश संपादन केले आहे. त्याच्या निवडीमुळे दयानंद कलाच्या गुणवत्ता यादीत आणखी भर पडली आहे. युवा कार्यक्रम व मंत्रालय भारत सरकार आणि नेहरू युवा केंद्र यांच्या वतीने राष्ट्रीय युवा संसद उत्सव 2023 ‘ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा फेरीमध्ये त्याने प्रथम क्रमांक मिळवला.राज्य फेरीमध्ये निवड होऊन आता तो ‘ राष्ट्रीय युवा संसद उत्सव 2023 ‘ साठी संसद भवन दिल्ली येथे महाराष्ट्र व गोवा राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी जाणार आहे.

त्याच्या या यशाबद्दल प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड व उपप्राचार्य डॉ. प्रशांत मान्नीकर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिलकुमार माळी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. सुभाष कदम, डॉ. सुनिता सांगोले, राष्ट्रीय सेवा योजना विभागीय समन्वयक डॉ. संदीपान जगदाळे हे उपस्थित होते. मेघराज यास डॉ. बालाजी घुटे, डॉ. संदीप जगदाळे, डॉ. गोपाल बाहेती, प्रा महेश जंगापल्ले यांनी मार्गदर्शन केले. मेघराजच्या यशाबद्दल दयानंद शिक्षण संस्थेचे मा. अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष अरविंद सोनवणे, ललितभाई शाह, रमेशकुमार राठी, सचिव रमेश बियाणी, संयुक्त सचिव सुरेश जैन, कोषाध्यक्ष संजय बोरा, पर्यवेक्षक डॉ.दिलीप नागरगोजे, कार्यालय अधीक्षक रूपचंद कुरे यांनी अभिनंदन केले आहे.

About The Author

error: Content is protected !!