एम आय एम वाढवणा शाखाअध्यक्ष पदी सलीम शेख
वाढवणा बु.(हुकूमत शेख) : वाढवणा( बु ) येथील एम आय एम च्या शाखा अध्यक्षपदी तरुण तडफदार मनमिळाऊ स्वभावाचे सर्वांना सोबत घेउन चालणारे सलीम शेख यांची निवड तालुका अध्यक्ष मुसा पठाण, शहर अध्यक्ष अखिल शेख यांनी केल्याचे नियुक्ती पत्र दिले आहे. यांच्या निवडी बद्दल माजी शाखा अध्यक्ष जुबेर शेख, आजम बागवान,सलीम तोंडारे,सईद ड्रायव्हर, अशोक गायकवाड, प्रकाश जाधव, तोफीक पठाण,शादुल पठाण, रफिक मौजन,अंबादास गायकवाड, मकसूद पठाण, नशीर शेख, शपिक शेख, केशव शिंदे, सगु हसन यांनी निवडीबद्दल शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.
