प्रा.डॉ.सी.टी.लोंढे यांची विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर निवड
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा गांधी महाविद्यालयातील भौतिक शास्त्र विषयाचे प्राध्यापक प्रा.डाॅ.चंद्रकांत त्रिंबकराव लोंढे यांची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील भौतिक शास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळावर कुलगुरु नियुक्त सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष ॲड. किशनराव बेंडकुळे, सचिव अँड. पी. डी. कदम, सदस्य सुरेशराव देशमुख, प्राचार्य कॅप्टन डॉ. अनिता शिंदे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. पी. बी. बाभुळगावकर महाविद्यालयातील भौतिक शास्त्र विभाग प्रमुख प्रा. डाॅ. के. एन. शिवलकर यासह, प्राध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केलं आहे.
