विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासासाठी सतत लढत राहणार-डॉ सूर्यकांत जोगदंड
उदगीर (एल.पी.उगीले) : स्वामुक्टा ही विद्यार्थी प्राध्यापक व विद्यापीठाचे वेगवेगळे प्रश्न सोडवण्यासाठी तसेच शिक्षण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणारी एकमेव संघटना आहे. या संघटनेच्या माध्यमातून सर्व प्राध्यापक एकजुटीने कार्य करत असतात, व वेळप्रसंगी चुकीच्या निर्णयाचा विरोध करतात. स्वामुक्टामुळेच आजपर्यंत प्राध्यापकांना अनेक लाभ भेटलेले आहेत. स्वामुक्टाच्या केंद्रीय समितीचा अध्यक्ष म्हणून यापुढील काळातही विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासासाठी सतत लढा देत राहणार, असे मत व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. सूर्यकांत जोगदंड यांनी व्यक्त केले. येथील शिवाजी महाविद्यालयाच्या वतीने डॉ. सूर्यकांत जोगदंड यांची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर निवड झाल्याबद्दल आयोजित केलेल्या सत्कार समारंभामध्ये ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनायकराव जाधव होते.
पुढे बोलताना डॉ. जोगदंड यांनी प्राध्यापकांच्या प्रश्नासंदर्भात सविस्तर चर्चा केली व संघटनेच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या कार्याची माहिती देत या कार्यात सोबतीने कार्य करणाऱ्या शिवाजी महाविद्यालयाच्या स्थानिक शाखेतील सर्व सदस्यांचे व महाविद्यालयाचे आभार व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप प्रसंगी विनायकराव जाधव यांनी जोगदंड यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. सिनेट सदस्य डॉ. विष्णू पवार, स्थानिक शाखेचे अध्यक्ष प्रा. अनंत टेकाळे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. प्रा. बालाजी सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे संचलन तर प्राध्यापक प्रतिनिधी डॉ. डी. बी. कोणाळे यांनी आभार व्यक्त केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. आर. एम. मांजरे, डॉ. एच. ए. तिरपुडे, डॉ. डी बी मुळे,डॉ. सुरेश शिंदे, डॉ. विश्वंभर गायकवाड, प्रा. रंजन यडतकर, डॉ. उर्मिला शिर्शी, डॉ. सुधाकर चाटे, प्रा शुभांगी पावडे यांची उपस्थिती होती.
