माजी गृहराज्यमंत्री आ. संजय बनसोडे राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक

माजी गृहराज्यमंत्री आ. संजय बनसोडे राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक

उदगीर (एल. पी. उगीले) : उदगीर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, महाविकास आघाडी सरकारच्या काळात पर्यावरण व वातावरणीय बदल, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन व संसदीय कार्य यासोबतच काही काळ गृहराज्यमंत्री म्हणून अत्यंत उत्कृष्ट कार्य केलेले उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे यांची लोकप्रियता आणि दांडगा जनसंपर्क, विकास कामाचा मोठा आवाका या सर्व गोष्टींचा विचार करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांची निवड स्टार प्रचारक म्हणून करण्यात आली आहे.

महाविकास आघाडीच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून आपल्या पदाला प्रतिष्ठा मिळवून देणारे, लोकप्रिय नेते म्हणून संजय बनसोडे यांनी नवी ओळख सर्वत्र निर्माण केली आहे. पक्ष संघटन बांधणीसाठी त्यांनी केलेले कार्य विचारात घेऊन आणि त्यांचा दांडगा जनसंपर्क याचा निश्चित फायदा महाविकास आघाडीला होईल. असे वाटल्यावरून पिंपरी चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी आ. संजय बनसोडे यांची स्टार प्रचारक म्हणून निवड केली आहे. त्यांची ही निवड म्हणजे निश्चितच उदगीर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदारांचा सन्मान आहे. आमदार बनसोडे यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. निवडणुका अत्यंत अटीतटीच्या असल्या तरी आ. संजय बनसोडे आपल्या लोकप्रियतेची आणि दांडग्या जनसंपर्काची जादू दाखवतील, अशी अपेक्षा महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांना वाटत आहे.

About The Author

error: Content is protected !!