श्री महादेव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात धनेगाव निरोप संपन्न

श्री महादेव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात धनेगाव निरोप संपन्न

देवणी (रणदिवे लक्ष्मण) : देवणी तालुक्यातील धनेगाव महाविद्यालयात दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, स्वागत गीता नंतर प्रमुख पाहुण्याचा‌ सत्कार झाला, या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य रामलिंग मुळे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संजय गवई प्राध्यापक महात्मा बसवेश्वर महाविद्यालय लातूर, ॲड सुजाता माने माजी बालकल्याण समिती सदस्य लातुर,वरूनराज सूर्यवंशी मिशन वासल समिती सदस्य देवणी, दहावीचे केंद्र प्रमुख बंडगर व बारावीचे केंद्रप्रमुख बनगर हे होते. व पांचाळ ताई व गिरी हे पण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी आपले अनुभव सांगितले. यात खोबे गौरी, अंकिता कारभारी, हिना पटेल, कांबळे यांचा समावेश होता. यावेळी वरूणराज सूर्यवंशी व अँड सुजाता माने,डॉ संजय गवई यांनी मुलांना योग्य मार्गदर्शन केले, तसेच प्राचार्य मुळें यांनी अध्यक्षीय भाषण केले. आभार बंडगर यांनी मांडले. यावेळी सुष्टी बिरादार यांनी सुत्रसंचालन केले.

About The Author

error: Content is protected !!