विद्या वर्धिनी हायस्कूल मध्ये पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा शांतते संपन्न

विद्या वर्धिनी हायस्कूल मध्ये पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा शांतते संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारा घेतल्या जाणाऱ्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती इयत्ता आठवी वर्गाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा शांततेत संपन्न झाली. या परीक्षा केंद्रावर एकूण 289 विद्यार्थ्यांची बैठकी व्यवस्था करण्यात आली होती. या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी केंद्र संचालक म्हणून केंद्रे दगडोबा यांनी काम पाहिले तर पर्यवेक्षक म्हणून एन.आर जवळे,वाय के बिरादार,व्हि.डी सुरवसे,एम.ए शेख,के.व्ही कांबळे,आर.डी जाधव,ए.बी राठोड,बी.ए गुट्टे, जी.बी नादरगे,ए.बी गायकवाड, व्ही.एन बिरादार,बी.डी पाटील, आर.व्ही मुंडकर,एस.एस उगिले यांनी काम पाहिले. तर परिचर म्हणून जी.एम कोतवाल,एम.एम शेख,डी.एन गायकवाड यांनी परिश्रम घेतले.शिष्यवृत्ती परीक्षा केंद्राला शिक्षण विभागाचे अधिकारी नितीन लोहकरे ,केंद्रप्रमुख बालाजी धमनसुरे यांनी भेट दिली.

About The Author

error: Content is protected !!