विद्या वर्धिनी हायस्कूलात व्हॅलेंटाईन डे ऐवजी विद्यार्थ्यांनी केला मातृ पित्र पूजन दिवस
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर द्वारा संचलित विद्यावर्धिनी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी 14 फेब्रुवारी 2023 हा दिवस व्हेलेंटाईन डे (प्रेम दिवस) पाश्चात्य संस्कृतीत साजरा केला जातो, मात्र उदगीर येथील विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीचा आदर्श जपत, आपल्या आई – वडिलांचे व आपल्या गुरुजनांचे पादुका पूजन करून हळद-कुंकू लावून पूजन करून पुष्पहार वाहून भारतीय संस्कृतीची ओळख करून देऊन मातृ पितृ पूजन दिवसाचा कार्यक्रम मोठ्या हर्ष उल्हासात साजरा केला. या कार्यक्रमासाठी 100 विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.हा कार्यक्रम विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी विद्यार्थीप्रिय, मुख्याध्यापक पदाचा पदभार घेऊन विद्यार्थ्यांना शिस्तीचे धडे देणारे, प्रशासकीय जाण असणारे बी.बी नागरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पर्यवेक्षक व्ही.एम बांगे,प्राथमिक मुख्याध्यापक पी.व्ही अजने, कलाशिक्षक एन.आर जवळे यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.व्ही बिरादार यांनी केले तर आभार राम ढगे यांनी मानले.