अहमदपूर च्या यशवंत विद्यालयात स्वंयशासन दिन उत्सहाच्या वातावरणात साजरा

अहमदपूर च्या यशवंत विद्यालयात स्वंयशासन दिन उत्सहाच्या वातावरणात साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील यशवंत विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा यासाठी एक दिवसीय स्वंयशासन दीन उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक म्हणून कुमारी आर्या देशमुख, उप मुख्याध्यापक किरण गुट्टे, सृष्टी पाटील, पर्यवेक्षक सृष्टी नलाबले, अजिंक्य मुसने, निरीक्षक शुभांगी पाटील, संस्कृती नागरगोजे, मुख्य लिपिक वैष्णवी बिरादार, परीक्षा प्रमुख सुरज हेमनर, क्रीडा शिक्षक संगम कुंटे, श्रुती आरदवाड, महेश कोल्हेवाड, शाळा सहाय्यक प्रथमेश गंगावारे, गोविंद केंद्रे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शालेय व्यवस्थापन अत्यंत चोख ठेवले होते. स्वशासन निरोप सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक व्ही व्ही गंपले होते.

यावेळी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्वयंशासन दिनातील शिक्षक अपूर्वा वाघमारे, गणेश जगताप, आबा भुतडा, अभिषेक जोशी यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला .याप्रसंगी सहशिक्षिका आबा भुतडा ,संस्कृती नागरगोजे, सृष्टी पाटील, अपूर्वा वाघमारे, किरण गुट्टे, आर्या देशमुख यांची मनोगत पर भाषणे झाली. यावेळी उप मुख्याध्यापक रमाकांत कोंडलवाडे, पर्यवेक्षक उमाकांत नरडेले, दिलीप गुळवे, विभाग प्रमुख राजकुमार पाटील, राम तत्तापुरे, शरद करकनाळे ,के. डी. बिराजदार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. अध्यक्ष समारोप व्ही व्ही गंपले यांनी मांनले. प्रास्ताविक राजकुमार पाटील यांनी सूत्रसंचालन शरद करकनाळे यांनी तर आभार राजेश कजेवाड यांनी मांनले.

About The Author