डॉ. विद्यासागर आचोले समाज भूषण पुरस्काराने सन्मानित
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर परिसरतील वैद्यकीय क्षेत्रात आपली सेवा देणारे आणि ज्यांच्या सेवेने अनेक गोरगरीब लोकांना उच्च दर्जाची सेवा तीही अगदी अल्प दरात उपलब्ध झाली पाहजेत अशी भूमिका घेऊन कार्य करणारे कार्यतत्पर आपल्या भागातील डॉक्टर विद्यासागर आचोले यांनी समाजास भरभरून सहकार्य करून अनेकांना आधार दिला आहे.
त्यांच्या कडे रुग्ण दाखल झाला तर प्रसूती ही साधारण होणारच हा शब्द उदगीर पंचक्रोशीतील स्वतः अनुभवलेली स्त्री रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक हक्काने आणि विश्वासाने सांगतात.आपल्या ग्रामीण भागातील शिकलेले डॉक्टर सहज मोठ्या शहरात अमाप प्रसिध्दी मिळउ शकले असते, मोठ्या शहरात जाऊन पैसाही कमवू शकले असते, पण ज्या भागातील लोकांनी या क्षेत्रामध्ये येण्यासाठी पाठबळ दिले. त्या प्रेमाची उतराई पुण्याच्या उदात्ते हेतूने डॉक्टर विद्यासागर अचोले यांनी आपले कार्यक्षेत्र उदगीर शहर निवडले.त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आणि त्यांनी दाखवलेली समाजाप्रती आत्मीयता जन माणसाच्या समोर आणण्यासाठी त्यांना समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
नुकतेच उदगीर तालुक्यातील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉक्टर विद्यासागर आचोले यांना सार्वजनिक शिवजयंती महोत्सव 2023 यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा “समाज भूषण” पुरस्कार महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पहार, देऊन सन्मानित करण्यात आले.
उदगीर परिसरातील नावलौकिक मिळवलेले डॉ. आचोले यांचे सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रातील कार्य अत्यंत मोलाचे आहे. समाजाचे हित लक्षात घेऊन त्यांनी समाज हिताचे व सामाजिक अनेक कार्य केलेले आहेत. ते सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात, एका लहानशा गावातून येऊन 2004 पासून उदगीर परिसरातील रुग्णांची सेवा करून आपल्या कर्तृत्व आणि दातृत्व याच्या बळावर ते आज यशाच्या शिखरावर आहेत.
यांच्या कार्याची दखल घेऊन सार्वजनिक शिवजयंती महोत्सव उदगीर च्या वतीने दिल्या जाणारा यावर्षीचा समाजभूषण पुरस्कार त्यांना नुकताच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत देऊन सन्मानित करण्यात आले. ज्यांच्या बोटाला धरून या जगात पहिला श्वास घेणाऱ्या सर्व पिढीचा हा सन्मान आहे. अचोले यांच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव अनेक मान्यवरांनी याप्रसंगी केला, तसेच त्यांच्या सामाजिक कार्य करणाऱ्या प्रवृत्तीचा आदर्श इतरांनी घ्यावा. असे आवाहन मान्यवरांनी केले.