लाल बहादूर शास्त्री प्राथमिक शाळेत संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त कार्यक्रम संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई संचलित लाल बहादूर शास्त्री प्राथमिक विद्यालयात संत सेवालाल महाराजांचा जीवन परिचय व्हावा म्हणून, सेवालाल महाराज जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे,प्रमुख वक्ते म्हणून बाळाराम बानापुरे व विभाग प्रमुख सुधाकर पोलावार उपस्थित होते.मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करुन सेवालाल महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.शाळेच्या वतीने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते बाळाराम बानापुरे यांनी संत सेवालाल महाराज यांनी सामाजिक,धार्मिक क्षेत्रात काम केले.बंजारा समाजाचे ते आराध्य दैवत होते.पर्यावरण रक्षण,अंधश्रद्धा निर्मूलन व समाजासाठी कार्य केले.धर्मरक्षणासाठी निजामाविरुध्द लढा उभारला.त्यांची शिकवण व वचने आजही समाजासाठी प्रेरणादायी आहेत.आपणही त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांची शिकवण आपल्या आचरणात आणावी.असे सविस्तर मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोपपर भाषणात मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांनी संत सेवालाल महाराजांनी दिलेल्या उपदेशाप्रमाणे आपण आचरण करुन, समाजसेवा व देशसेवेसाठी सदैव तत्पर रहावे, असे आवाहन केले. सुत्रसंचलन श्रीमती निताताई वट्टमवार यांनी केली.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.