श्री संत सेवालाल महाराज जयंती हकनकवाडी येथे रक्तदान शिबिराने साजरी

श्री संत सेवालाल महाराज जयंती हकनकवाडी येथे रक्तदान शिबिराने साजरी

उदगीर (एल.पी.उगीले) : तालुक्यातील हकनकवाडी येथे श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त रक्तदान शिबिर आयोजित केले होते, अगदी विशीतील तरुणांनी पहिल्यांदाच अशा प्रकारची सामाजिक चळवळ हातात घेत हे शिबिर करण्याचे धाडस केले. या शिबिरात प्रामुख्याने पहिल्यांदा रक्तदान करणाऱ्यांची संख्या जास्त होती. आजतागायत हकनकवाडी परिसरातील हे पहिले रक्तदान शिबिर ठरले.

यावेळी राठोड गोपाळ रामजी,सूर्यकांत राम पवार,युवराज नामदेव राठोड,शालू पवन राठोड,रामेश्वर दत्तात्रय पवार,सचिन गुणवंत पवार,नामदेव बालाजी पवार,रमेश शिवाजी पवार,जयराम रामजी राठोड,महादेव भास्कर पवार यांनी ही जयंती रक्तदान करून साजरी केली.

या शिबिरासाठी प्रवीण आडे व योगेश पवार यांनी परिश्रम घेत ग्रामीण भागातील तरुणांना रक्तदान ही चळवळ किती महत्त्वाची आहे, हे सांगत पहिल्यांदा रक्तदान करण्यासाठी प्रेरित केले.या वेळी रक्त संकलन करण्याचे कार्य नागप्‍पा अंबरखाने ब्लड सेंटर उदगीरच्या वतीने डॉ. शेटकार बस्वराज,ओमकार गांजुरे,अविनाश बिरादार,संगम स्वामी,विनायक टकटवळे यांनी केले.

About The Author

error: Content is protected !!