बोळेगाव येथे घरफोडी; दहा ग्राम सोने पळविले

बोळेगाव येथे घरफोडी; दहा ग्राम सोने पळविले

दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल

देवणी (रणदिवे लक्ष्मण) : देवणी तालुक्यातील बोळेगाव येथील बंद घर फोडून दहा ग्राम सोन्याचे दागिने पळविल्या प्रकरणी दोन अज्ञाता विरोधात देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.बोळेगाव येथील हणमंत बाबुराव गोटे हे पुणे येथे जात असताना फिर्यादीचे जागेअभावी सोयाबीनचे १२५ कट्टे घरात ठेवून कुलूप लावून एक चावी फिर्यादीस देऊन गेले होते. दि. ४ फेब्रुवारी रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हा शेतातून उसाला पाणी देऊन बंद घराकडे पाहाण्यासाठी गेले असता घराचे कुलूप तुटल्याचे दिसून आले. मात्र सोयाबीनचे कट्टे ठेवलेल्या खोलीचे कुलूप तुटले नसल्याचे दिसून आले. फिर्यादी हा घराचीपाहाणी करीत असताना अंधारात दबाव धरून बसलेल्या दोघांनी फिर्यादीच्या अंगावर धावून येऊन हातातील लोखंडी रॉडने डोक्यात मारून जखमी केले व पळून गेले.

यावेळी फिर्यादीच्या आरडाओरडाने गावकरी जमा झाले. घरमालकाचे संदकातील ५ ग्राम सोन्याचे मनी व ५ ग्राम सोन्याची अंगठी पळविल्याचे दिसून आले. या प्रकरणी सुनील मलिकार्जून पाटील (रा. बोळेगाव) यांच्या फिर्यादीवरून देवणी पोलीस ठाण्यात गुरनं. ३४/२०२३ कलम ४५९,३८०,३४ भादंविप्रमाणे दोन अज्ञात व्यक्तीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास गणेश सोंडारे हे करीत आहेत.

About The Author