मै भी डिजिटल” कार्यशाळा भारतीय स्टेट बँकेच्या सहाय्याने उत्साहात संपन्न

मै भी डिजिटल" कार्यशाळा भारतीय स्टेट बँकेच्या सहाय्याने उत्साहात संपन्न

उदगीर(एल.पी.उगीले) : उदगीर नगरपरिषद द्वारे दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियाना अंतर्गत कोव्हीड १९ पासून पथविक्रेते/ फेरीवाले यांचे व्यवसाय पुन्हा नवीन उमेदीने सुरु होवेत, त्याकरिता प्रधानमंत्री आत्म निर्भर भारत उपक्रमा अंतर्गत पी.एम.स्वनिधी योजना सुरु झाली आहे.

पी.एम.स्वनिधी योजनेद्वारे पथविक्रेते/ फेरीवाले यांना व्यवसाय उलाढालीस प्रथम कर्ज रु.१० हजार, नियमित परत फेडी नंतर द्वितीय २० हजार, तृतीय रु.५० हजार भांडवली रक्कम नाममात्र व्याज दराने सर्व राष्ट्रीयकृत बँकांच्या सहाय्यने उपलब्ध करून दिले जात आहे. पी.एम स्वविधी योजनेचा लाभ शहरातील सर्व पथविक्रेते / फेरीवाले यांनी घेवून आपला व्यवसाय उत्तम प्रकारे चालवून तसेच आपले शहर स्वच्छ ठेवण्यास नगरपरिषदेस सहकार्य करावे. असे आवाहन मुख्याधिकारी शुभम क्यातमवार यांनी केले.

पी.एम.स्वनिधी योजनेतील पथविक्रेते कर्ज मिळण्या पासून ते परत फेड आणि इतर लाभ याकरिता त्यांना व्यवहार माहिती व्हावा, डिजिटल आर्थिक साक्षरता यावी, याकरिता “मै भी डिजिटल ४.०” या उपक्रमाद्वारे कर्ज प्राप्त पथविक्रेते/ फेरीवाले यांनी आपल्या ग्राहका कडून डिजिटल पेमेंट स्वीकारावे, या हेतून प्रत्येक पथविक्रेत्यास बँक खातेनिहाय क्यू आर कोड द्यावा. त्याने ग्राहका कडून रु.३० पेक्षा अधिक पेमेंट स्वीकारल्या नंतर त्यास प्रत्येकी रु.१ अतिरिक्त लाभ शासनाद्वारे मिळेल असे प्रति महिना १०० ग्राहकांकडून पेमेंट स्वीकारू शकतात. अश्या प्रकारचा लाभ मै भी डिजिटल च्या माध्यमातून मिळेल.

दि.१५ फेब्रुवारी २०२३ रोजी भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत पथविक्रेते/ फेरीवाले यांना क्यू आर कोड वितरण भारतीय स्टेट बँक व्यवसाय विभाग लातूर कार्यालायचे विभागीय अधिकारी प्रविण मांडेकर यांच्या शुभहस्ते तर मुख्य शाखा व्यवस्थापक लक्ष्मण सरंबळकर यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला.

याप्रसंगी भारतीय स्टेट बँकेचे मुख्य शाखा व्यवस्थापक लक्ष्मण सरंबळकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ७८ पथविक्रेत्यांना एस.बी.आय. बँके ने पी.एम.स्वनिधीचा लाभ दिला असून त्यांनी बँक व शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देत लाभार्थ्यांना बँकेच्या कोणत्या हि कामाबाबत अडचण आल्यास माझ्या दालनाचे दार सदैव उघडे आहे, माझ्याकडून तुमच्या सर्व शंकांचे समाधान करण्याचा मी प्रयत्न करेन असे सांगितले. तर विभागीय अधिकारी प्रविण मांडेकर यांनी सांगितले की, भारतीय स्टेट बँके शासकीय सर्व योजनांची अंमलबजावणी करण्यास सदैव अग्रेसर असते. पी.एम.स्वनिधीच्या तिन्ही टप्प्यातील कर्ज योजनेचा लाभ घेवुन बँकेत आपली पत निर्माण करावी. त्यामुळे भविष्यात भारतीय स्टेट बँक इतर मोठ्या कर्जासाठी सुद्धा तयार असेल असे आश्वसन दिले.

कार्यकर्माचे सूत्रसंचलन शहर अभियान व्यवस्थापक महारुद्र गालट यांनी तर आभार प्रदर्शन विशाल गुडसुरकर यांनी मांडले.

About The Author