अहमदपुरच्या फुले महाविद्यालयात आज आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

अहमदपुरच्या फुले महाविद्यालयात आज आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने ‘वैश्विक परिदृश्यातून भारत ‘ या विषयावर आज दि. १७ फेब्रुवारी शुक्रवार रोजी एक दिवसीय आंतर विद्याशाखीय, आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूरच्या ग्रंथालय विभागाच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय आंतरविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महात्मा फुले महाविद्यालयाच्या सुसज्ज सभागृहात सकाळी ठीक दहा वाजता सातवाहन विद्यापीठ, करीमनगर, तेलंगणाचे माजी कुलगुरू डॉ. मोहम्मद इकबाल अली यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार असून, या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. श्रीरंगराव पाटील एकंबेकर हे भूषविणार आहेत , तर श्री. डी. आर. झोडगे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

यावेळी बीज भाषक म्हणून ग्वांगडोंग विद्यापीठ, चीन येथील परकीय भाषा विभागाचे प्रोफेसर डॉ. विवेक मनी त्रिपाठी हे उपस्थित राहणार आहेत. या परिषदेचा समारोप सायंकाळी ४.३० वाजता महाराष्ट्रातील ख्यातनाम लेखक, समीक्षक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता डॉ.डी.एम. खंदारे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या परिषदेसाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने संशोधक, विद्यार्थी व प्राध्यापकांना कार्य रजा मंजूर केली असून जास्तीत जास्त संख्येने प्राध्यापक व संशोधकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

या परिषदेचा मुख्य विषय ‘वैश्विक परिदृश्यातून भारत ‘ हा असून वैश्विक परिदृश्यातून भारतीय साहित्य, भारतीय प्रशासन, भारतीय राजकारण, भारतीय संरक्षण, भारतीय युद्धनीती, भारतीय इतिहास, भारतीय सामाजिक सुधारणा, हवामान बदल समस्येत भारताची भूमिका, हिंदी भाषा, साहित्य और संस्कृती, इंग्लिश फॉर्म ग्लोबल प्रिस्पेक्टिव्ह, भारतीय अर्थकारण, भारतीय विज्ञान व तंत्रज्ञान, भारतीय भूविज्ञान, भारतीय ग्रंथालय व्यवस्थापन व ग्रंथालय व्यवस्थापनाची आधुनिकीकरण तसेच भारतीय तत्त्वज्ञान, मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती, याबरोबरच वैश्विक दृष्ट्या मानवी जीवनात खेळाचे महत्त्व आदी उपविषयांवर मराठी, हिंदी, इंग्रजी व संस्कृत या भाषेमध्ये शोधनिबंध पाठविण्याचे तसेच आंतरराष्ट्रीय परिषदेस उपस्थित राहण्याचे आवाहन परिषदेचे मुख्य निमंत्रक प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील, उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, यांच्यासह आंतरराष्ट्रीय परिषदेचे संयोजक ग्रंथपाल प्रा. परमेश्वर इंगळे यांनी केले आहे.

About The Author