महात्मा फुले महाविद्यालयात सेवालाल महाराज व नरवीर तानाजी मालुसरे यांना अभिवादन
अहमदपूर ( गोविंद काळे) : भारतातील थोर समाजसुधारक व अध्यात्मिक गुरू संत सेवालाल महाराज यांची जयंती व छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील लढवय्ये सच्चे सैनिक नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शहिद दिनाच्या निमित्ताने येथील महात्मा फुले महाविद्यालयात त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला इतिहास विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणातून दोन्ही महामानवांच्या जीवन कार्याची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केला. यावेळी ते म्हणाले की, भारतीय माती ही जगात थोर असून, या मातीतून अनेक नरवीर उपजले. त्यापैकीच संत सेवा भाया आणि नरवीर तानाजी मालुसरे हे होत. अशा महामानवांच्या जीवन चरित्रातून सर्वांनी प्रेरणा घेतली पाहिजे, असेही यावेळी ते म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संतोष पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. अनिल मुंढे यांनी केले, तर आभार डॉ. मारोती कसाब यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.