महापराक्रमी साहित्यिक युवराज छत्रपती संभाजी राजे – आकांक्षा विश्वानाथे

महापराक्रमी साहित्यिक युवराज छत्रपती संभाजी राजे - आकांक्षा विश्वानाथे

उदगीर (एल.पी.उगीले) : शिवरायांच्या पश्चात औरंगजेब बादशहा साडेपाच लाखाची फौज घेऊन महाराष्ट्रावर चालून आला. छत्रपती संभाजी महाराजांचे स्वराज्य बळकवण्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले. परंतु तो यशस्वी होऊ शकला नाही. छत्रपती संभाजी राजांनी स्वराज्यातील एकही किल्ला औरंगजेबाला जिंकू दिला नाही. त्यामुळे औरंगजेब निराश झाला, त्याचे धैर्य खचले आणि तो आदिलशाही, कुतुबशाहीकडे वळला. आदिलशाही, कुतुबशाही एका वर्षातच त्यांनी जिंकली. परंतु त्याला स्वराज्य जिंकता आले नाही. या पाठीमागे छत्रपती संभाजी महाराजांचा महापराक्रम आहे. छत्रपती संभाजी राजांना एकाच वेळी  मोगल, पोर्तुगीज, इंग्रज यांच्याशी लढा द्यावा लागला.छत्रपती संभाजी राजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी नखशिख ,नायिकाभेद, सात शतक, बूधभूषण असे ग्रंथ लिहिले. असे प्रतिपादन सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत बालव्याख्याती आकांक्षा  विश्वनाथे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सुनील इंगोले हे होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी शफी शेख, सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अजित पाटील तोंडचिरकर, विराज पाटील शिरोळकर,विठ्ठल जाधव, विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबुराव नागरवाड, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पी. व्ही.अजणे, विद्या वर्धिनी इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य सुप्रिया जाधव, एम.एस जाधव,भगवान बिरादार, के.एम राजूरकर,चंद्रकांत जाधव, सरिता हरकरे यांची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भीमसेन भडंगे यांनी केले तर आभार संदीप चिखले यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंगद राठोड, कलाशिक्षक एन.आर जवळे,देवराव गायकवाड यांनी परिश्रम घेतले.

About The Author