लाल बहादूर शास्त्री प्राथमिक शाळेत आरोग्य तपासणी

लाल बहादूर शास्त्री प्राथमिक शाळेत आरोग्य तपासणी

उदगीर (एल.पी.उगीले) : भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई संचलित लाल बहादूर शास्त्री प्राथमिक विद्यालयात इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. किरकोळ आजारी विद्यार्थ्यांना औषधोपचार देण्यात आले.गंभीर आजारी विद्यार्थ्यांना पुढील उपचारासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.वैयक्तीक स्वच्छता व सकस आहार याविषयी मार्गदर्शन केले.

या पथकात डॉ सौ.सौंदळे, डॉ.जे.एन.वर्धमान, डॉ.जी.डी.राठोड,औषध निर्माण अधिकारी एम. एन. नवाडे व परिचारिका खाडप व्हि.आर.यांच्या मार्गदर्शनाखाली ही आरोग्य तपासणी संपन्न झाली.

या आरोग्य तपासणीसाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी पुढाकार घेऊन सहकार्य केले.आरोग्य तपासणी व्यवस्थित पार पाडल्याबद्दल मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांनी आरोग्य पथकाचे आभार मानले .

About The Author

error: Content is protected !!