पुण्यात सदानंद रीजन्सी मध्ये झाली मिस आणि मिसेस इंडिया 2023 स्पर्धा
पुणे (केशव नवले) : पुण्यात सदानंद रीजन्सी मध्ये ताज इव्हेंट अँड प्रोडक्शन तर्फे ताज मिस आणि मिसेस इंडिया 2023 स्पर्धा पार पडली. 40 स्पर्धक यामध्ये सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिमरन पाटेकर यांनी तर परीक्षक म्हणून ताज इव्हेंट्स अँड प्रोडक्शनच्या ब्रँड अँबेसिडर पिया रॉय, मराठी कलाकार धनश्री बाहेकर, मराठी ॲक्टर चेतन चावडा आणि डॉक्टर सागर अभीचंदाने यांनी केले.
या स्पर्धेमध्ये मिस कॅटेगिरी मध्ये अक्षता राक्षे प्रथम विजेत्या झाल्या, तर नताशा सदाफळे, इशा विशाखांडे रनर अप म्हणून विजेत्या झाल्या. मिसेस गोल्ड कॅटेगिरी मधून भारती पाटील प्रथम विजेत्या झाल्या, तर एलसीना काराईल, प्रियंका भुसारे, मंजू सावंत रनरअप म्हणून विजेत्या झाल्या.
मिसेस प्लॅटिनम कॅटेगिरी मधून प्राची इनामदार प्रथम विजेत्या झाल्या, तसंच शिल्पी बॅनर्जी, रोझिना राणा, कविता पठारे रनरअप म्हणून विजेत्या झाल्या. अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात विजेत्या स्पर्धकांना क्राऊन ट्रॉफी सर्टिफिकेट व गिफ्ट देऊन सन्मानित करण्यात आले.